भंडारा(Bhandara/ Power Supply):- राज्य सरकारने(State Govt) महावितरणच्या माध्यमातून प्रीपेड मिटर (Prepaid meter) लावण्याचा निर्णय घेण्यात आला. प्रीपेड मिटरच्या माध्यमातून सर्वसामान्य विज ग्राहकांची मिटरची अधिकची किंमत घेऊन आर्थिक लुट करण्याचा प्रयत्न केला जात आहे. शासनाच्या या तुघलकी निर्णयामुळे विज ग्राहकांवर आर्थिक भुर्दंड बसणार असल्याने असंतोष निर्माण झाला. शासनाच्या या निर्णयामुळे भंडार्यात सुध्दा प्रीपेड मिटरला विरोध केला जात आहे. याकरीता दि.१२ जून रोजी सकाळी ११.३० वाजता भंडारा येथे वीज वितरण (Power distribution) कार्यालयासमोर शासनाच्या निर्णयाविरोधात आमआदमी पार्टीच्या (Aam Aadmi Party) वतीने निषेध आंदोलन करण्यात आले. आपच्या वतीने निवेदन देण्यात आले.
सर्वसामान्य वीज ग्राहकांना न परवडणारे प्रीपेड मिटर लावण्याचा निर्णय
राज्य सरकारने जुन्या मिटर ऐवजी सर्वसामान्य वीज ग्राहकांना न परवडणारे प्रीपेड मिटर लावण्याचा निर्णय घेतला. याचा वीज ग्राहकांना फायदा नसून आर्थिक भुर्दंड बसणार आहे. शासनाच्या या निर्णयाला भंडारा जिल्ह्यात विरोध असून आमआदमी पार्टी तर्फे आंदोलन करण्यात आले. शासनाच्या या निर्णयाचा निषेध करुन शासनाविरोधात घोषणा देण्यात आल्या. यावेळी आमआदमी पार्टीचे प्रवक्ता डॉ.नितीन तुरस्कर, शहर अध्यक्ष अतुल लोणारे, जिल्हा अध्यक्ष चंचल साळवे यांनी आंदोलनकर्त्यांना मार्गदर्शन केले. यावेळी दिलीप निखाडे, दिलीप घरडे, सुरज मदनकर, पवन घन, अनवर शेख, भुपेश गणवीर, आकाश ननवरे, शुभाष मंजूरकर, कामेश लेंडे, सत्यजित लेंडे, ज्ञानेश्वर फुले, सुनिता वाहने, सोनाली फुले, धम्मदिप चव्हान, नरेश सार्वे, सुर्वना मेश्राम, छाया घरडे, सचिन बालपांडे, आकाश बनपुरकर, किशोर मेश्राम, स्वप्निल शिंदे व जिल्ह्यातील पदाधिकारी उपस्थित होते.