परभणी/जिंतूर(Parbhani):- औंढा रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम सूरु आहे या कामासाठी तालुक्यातील चामणी येथील एका शेतातून अवैध रित्या मुरुमाचे उत्खनन करून ते रस्त्याच्या कामासाठी वापरले जात असल्याची माहिती सेलूच्या उपविभागीय अधीकारी संगीता सानप यांना मिळाली. त्यांनी त्यांच्या पथकासह पाहणी केली असता त्या ठिकाणी अवैधरित्या उत्खन सुरू असल्याचे दिसून आल्याने त्यांनी अवैध उत्खनन करणारे पोकलेन व पाच हायवा ट्रक जप्त करून तहसील कार्यालयाच्या आवारात आणून लावले ही कार्यवाही सोमवार दि 13 मे रोजी चार वाजेच्या सुमारास घडली.
उपविभागीय अधिकारी संगीता सानप यांची कार्यवाही
या बाबत अधिक माहिती अशी की जिंतूर ते औंढा सिमेंट रस्त्याचे(cement road) काम सुरू असून या कामासाठी चामणी येथील गट क्रमांक 62 मध्ये अवैध रित्या (Illegal) मुरुमाचे उत्खनन करून तो मुरूम हायवा द्वारे रस्त्याच्या कामासाठी वापरला जात होता दरम्यान अवैद्य मुरूम वाहतुकीची माहिती सेलूच्या उपविभागीय अधिकारी संगीता सानप यांना मिळाली त्यावरून त्यांनी चामणीचे तलाठी स्नेहा गायकवाड, मोहसीन पठाण, पाटील यांना सोबत घेऊन पाहणी केली. यावेळी संबंधित कंत्राटदाराने कोणत्याही प्रकारची परवानगी न घेता नमूद गट नंबर मध्ये पोकलेन मशीन (Poklen Machine) द्वारे उत्खनन करून ते हायवा ट्रकद्वारे वाहतूक करून रस्त्याच्या कामाला वापरत असल्याचे दिसून आले.
त्यांनी लगेच उत्खनन करणारी पोकलेन मशीन सह मुरुमाने भरलेले हायवा क्रमांक एम एच 12 व्ही टी 5926,एम एच 12 व्ही टी 5920, एम एच 12 व्ही टी 5928, एम एच 12 व्ही टी 5924, एम एच 12 व्ही टी 5927,एम एच 12 व्ही टी 5927 हायवा जप्त केले, असून सर्व वाहाने तहसील कार्यालयात आणून लावण्यात आले. या कार्यवाहिमुळे(process) अवैध उत्खनन करणाऱ्याचे धाबे दणाणले असून शहरातील विविध भागात दररोज मोठ्या प्रमाणात अवैध रित्या गौण खनिजांची चोरटी वाहतूक होत असल्याने त्याकडेलही लक्ष देण्याची मागणी नागरिकांतून होत आहे.