नवा मोंढा पोलिसांची निष्क्रीयता मुलीचे कुटूंबीय चिंताग्रस्त
परभणी (Parbhani Crime) : शहरातील आहिल्याबाई होळकर नगर येथे वास्तव्यास असलेल्या एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलीचे अज्ञात इसमाने अपहरण केल्याची तक्रार २५ ऑक्टोबर २०२४ रोजी नवा मोंढा पोलीस ठाण्यात देण्यात आली. अडिच महिन्यानंतरही मुलीचा शोध लागलेला नाही. पालकांनी तक्रारीत एका संशयीताचा मोबाईल क्रमांकही दिला आहे. मात्र (Parbhani Crime) नवा मोंढा पोलिसांच्या निष्क्रीय कारभारामुळे अद्याप तरी मुलगी मिळालेली नाही. यामुळे मुलीचे कुटूंबीय चिंताग्रस्त झाले आहेत.
या घटनेविषयी अधिक माहिती अशी की, १७ वर्षीय मुलगी ही रामकृष्ण नगर येथे मेहंदीच्या क्लासला जाते म्हणून २४ ऑक्टोबर रोजी सकाळी अकरा वाजता घराबाहेर पडली होती. मात्र सायंकाळी उशीरापर्यंत मुलगी परत आली नाही. नातेवाईक, मित्रमंडळीकडे शोध घेऊनही मुलगी मिळून न आल्याने नवा मोंढा पोलिसात पालकांनी अपहरणाची तक्रार दिली. एका संशयीताचा मोबाईल क्रमांकही दिला. (Parbhani Crime) गुन्हा नोंद झाल्यानंतर अडिच महिने उलटून गेले तरी मुलीचा शोध लागलेला नाही. या बाबत मुलीच्या पालकांनी जिल्हाधिकार्यांकडे देखील अर्ज दिला होता. त्यानंतरही अपेक्षित अशी कारवाई झालेली नाही. मुलगी न मिळाल्याने कुटूंबीय चिंताग्रस्त आहेत.
तपासात दिरंगाई
मुलीच्या अपहरणाचा गुन्हा (Parbhani Crime) नोंद झाल्यानंतर पोलिसांनी शोध पत्रिका काढली. मात्र मुलगी मिळून आली नाही. तपास संथगतीने सुरू आहे. नवा मोंढा पोलीस तपासात फारशे गांभिर्य दाखवत नसल्याचे दिसत आहे. मुलीचा शोध लावावा, अशी मागणी पालकांनी केली आहे.