हिंगोली (Abdul Sattar) : जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून झालेल्या अतिवृष्टी बाधित भागाची पाहणी करण्यासाठी राज्याचे अल्पसंख्यांक विकास, औकाफ, पणन मंत्री तथा जिल्ह्याचे पालक मंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) आज रात्री हिंगोली जिल्हा दौ-यावर येत आहेत. जिल्ह्यात झालेल्या नुकसानीचा आज जिल्हा नियोजन समिती सभागृहात ते आढावा घेणार आहेत.
उद्या मंगळवार (दि.३) रोजी सकाळी ६:४५ वाजता शासकीय विश्रामगृह येथून कळमनुरी व हिंगोली तालुक्यातील अतिवृष्टीने नुकसान झालेल्या गावांची ते प्रत्यक्ष भेट देत पाहणी करणार आहेत. अतिवृष्टीने नुकसान झालेल्या गावांमध्ये कळमनुरी तालुक्यातील सोंडेगाव आणि डोंगरगाव पूल तर हिंगोली तालुक्यातील सावरखेडा आणि आडगाव येथे भेट देत या भागाची पाहणी करणार आहेत. त्यानंतर पालक मंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) हे सकाळी ९:३० वाजता हिंगोली येथून छत्रपती संभाजीनगरकडे मोटारीने प्रयाण करतील.