हिंगोली (Hingoli Collector) : हिंगोलीच्या जिल्हाधिकारी पदी अभिनव गोयल गुरुवारी 29 ऑगस्ट रोजी रुजू झाले आहेत. त्यांनी प्रभारी तथा अपर जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी यांच्याकडून जिल्हाधिकारी पदाचा कार्यभार स्वीकारला. जिल्हाधिकारी अभिनव गोयल (Abhinav Goyal) यांनी आयआयटी कानपूर येथून सिव्हील इंजिनिअरची पदवी घेतली आहे. ते सन 2016 च्या बॅचचे आयएएस अधिकारी आहेत.
त्यांनी यापूर्वी नांदेड जिल्ह्यातील किनवट येथे आदिवासी विकास प्रकल्प विभागात सहायक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी म्हणून काम केले आहे. तसेच त्यांनी लातूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, धुळ्याचे जिल्हाधिकारी म्हणून काम केले आहे. दरम्यान जिल्हाधिकारी गोयल (Abhinav Goyal) यांनी पदभार स्वीकारल्यानंतर 30 ऑगस्ट ला आमदार तानाजीराव मुटकुळे यांच्यासह अनेक राजकीय पक्ष विविध संघटना व कर्मचाऱ्यांच्या शिष्टमंडळाने त्यांचा सत्कार केला.