चिखली(Buldhana):- चिखली शहरातील शाहूनगर या रहिवासी वस्तीमध्ये 22 ऑक्टोबर च्या सव्वा बारा वाजेच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी घराचे कुलूप तोडून घरातील तीन कपाटाचे कुलूप तोडून जवळपास 12 लाख रुपये किमतीच्या सोन्याच्या दागिन्यावर डल्ला मारला शहरात भर दिवसा घरपोडी झाल्याने ऐन सणासुदीच्या दिवसांमध्ये नागरिकात घबराट पसरली आहे.
ऐन सणासुदीच्या दिवसांमध्ये नागरिकात घबराट पसरली
चिखली शहरातील शाहूनगर या रहिवासी भागांमधील अक्षय बाबुराव गोराडे यांच्या घराला बाहेरून कुलूप लावलेले असल्याची संधी साधून चोरट्यांनी टामीच्या साह्याने घराचे कुलूप तोडून घरातील सोन्याचे दागिने(Gold ornaments) लंपास केले. अक्षय बाबुराव घोराडे हे शेती कामानिमित्त सकाळी शेलसुर येथे गेले होते व भाऊ साडेअकरा वाजता ड्युटीवर गेला होता. यावेळी घराला तसेच गेटला कुलूप लावले होते. मात्र सव्वा बारा वाजेच्या सुमारास डोक्यात हेल्मेट घातलेल्या अज्ञात चोरट्याने लोखंडी टामीच्या साह्याने कुलूप तोडून घरात प्रवेश केला आणि घरातील तीन कपाटाचे कुलपे टायमीच्या साह्याने तोडून कपाटात ठेवलेले आईचे 1994 साली केलेले सोन्याचे दागिने तसेच मागील वर्षी पत्नीचे केलेले दागिने वडिलांचा गोप 2 गोप २अंगठ्या स्वतःच्या दोन अंगठ्या असा जवळपास 12 लाख रुपयाचा ऐवज चोरट्यांनी पळवल्याची माहिती अक्षय गोराडे यांनी दिली. तीन वाजेच्या सुमारास जेव्हा अक्षय बोराडे व आई घरी आले तेव्हा फाटकाची कुलूप लावलेले आढळून आले. मात्र दरवाजाची कुलूप तोडलेले आढळून आले आणि आत जाऊन पाहताच दोन्ही रूम मधील तिन्ही कपाटाचे आढळले व त्या ठिकाणी एक लोखंडीत आम्ही आढळून आली. घटनेची माहिती अक्षय घोरणे यांनी चिखली पोलिसांना दिली असता पोलिसांनी चोरट्याचा शोध सुरू केला आहे. परिसरातील सीसीटीव्ही (CCTV) चेक करून चोरट्यांना शोधण्याकामी पोलिसांची यंत्रणा कामाला लागली आहे.