परभणी/गंगाखेड(Parbhani):- मराठा आरक्षण योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्याबद्दल फेसबुकवर (Facebook)आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्या विरुद्ध दि. ८ सप्टेंबर रोजी गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे.
परभणीत एका विरुद्ध गुन्हा दाखल
गंगाखेड तालुक्यातील सिध्देश्वर मुरकुटे नामक व्यक्तीने त्याच्या फेसबुकवर मराठा आरक्षण संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांच्याबद्दल आक्षेपार्ह पोस्ट करून सकल मराठा समाज बांधवांच्या भावना दुखावून सामाजिक सलोखा बिघडविण्याचा प्रयत्न दि. ८ सप्टेंबर रोजी सकल मराठा समाज समन्वय समितीचे तालुकाध्यक्ष श्रीकांत भोसले यांच्यासह सदाशिव भोसले, कृष्णा भोसले, बालासाहेब टोले, उत्तम भोसले, भागवत सातपुते, कल्याण भोसले, गंगाधर सातपुते, विश्वंभर भोसले, श्रीधर सातपुते, रामेश्वर बचाटे, बालासाहेब बेद्रे, राजेभाऊ भोसले, अक्षय सातपुते, नरेश भोसले, दिनेश सातपुते, भरत जाधव, श्रीधर सातपुते, शरद पवार, किरण धापसे, बळी यादव, राम भिसे, शिवानंद भुजबळ, गणेश भिसे, आकाश धोंडगे, दत्ता भिसे आदींनी पोलीस ठाण्यात सहायक पोलीस निरीक्षक आदित्य लोणीकर यांची भेट घेऊन निवेदन सादर करत कार्यवाहीची मागणी करून ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा दिल्याने याप्रकरणी श्रीकांत भोसले यांच्या फिर्यादीवरून सिध्देश्वर मुरकुटे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे.