मानोरा(Manora):- जनसंघर्ष अर्बन निधीच्या अध्यक्षसह सात संचालकांनी कोटी रूपयाचा घोटाळा (Scam) करुन फरार झाले होते. या प्रकरणातील ३ संचालकांना दि. ३ जानेवारी रोजी पोलीसांनी अटक केली आहे. सर्व आरोपींची संपत्ती जप्त करून सर्व खातेदार यांची रक्कम परत करण्याची कार्यवाही करावी तसेच दोषी आरोपींना कठोर शासन करावे, असे निवेदन तहसीलदार मार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस(Devendra fadanvis) यांना कार्यवाही करणेसाठी खातेदार यांना पाठविले आहे.
तहसिलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन
जनसंघर्ष अर्बन निधीच्या ७ शाखेत खातेदार ठेविदार यांनी कोटींचा घरात १२ टक्के व्याजदराने गुंतवणूक केली आहे . दरम्यान ९ डिसेंबर रोजी अचानक शाखा बंद पडल्याने खातेदार ठेविदारात एकच खळबळ उडाली. आता आपली जमा रक्कम परत कधी मिळणार या विवंचनेत खातेदार, ठेविदार सापडले आहेत. नागरिकांनी जिवन संघर्षातून जमा राशी १२ टक्के व्याजदराने गुंतवणूक केली. शाखा अचानकच बंद पडल्याने ती राशी परत मिळण्याकरिता स्वतः संघर्ष करीत आहे. शहरातील इतर बँकेच्या तुलनेत अतिरिक्त म्हणजे १२ टक्के व्याजदराचे आमीष दाखवीत ७ ठिकाणी थाटात राजकीय नेत्यांच्या हस्ते उद्घाटन व शुभारंभ करुन जनसंघर्ष अर्बन निधींची शाखा स्थापन करुन त्या विविध शाखेत खातेदार व ठेवीदारांनी कोटींच्या घरात राशी जमा केलीत.
९ डिसेंबरला शाखा अचानकच बंद पडल्याने एकच खळबळ
जमा राशी व्याजासह परत मिळण्याकरिता शाखेत धाव घेतली असता ९ डिसेंबर ला शाखा अचानकच बंद पडल्याने एकच खळबळ उडाली होती. जनसंघर्ष अर्बन निधीचे अध्यक्ष व संचालकांनी ४४ कोटींची आपली फसवणूक करुन संचालक मंडळांनी संगनमत करून पळ काढला आहे. एकूण ७ पैकी ३ संचालकांना पोलीसांनी अटक केली आहे. या घोटाळा प्रकरणातील फरार चार आरोपी व अटक करण्यात आलेल्या तीन संचालकांची संपत्ती जप्त करून खातेदार व ठेवीदार यांना परत करून दोषीना कठोर शासन करावे असे निवेदन मुख्यमंत्र्यांना खातेदार ठेवीदार आदींनी तहसिलदार मार्फत पाठविले आहे. निवेदन देतेवेळी कृष्णा रणखास, गिरीश तापडिया, राम पाटील राऊत, निलेश चव्हाण, मयुर तवर आदीसह इतर उपस्थित होते.