औरंगजेबचे उदात्तीकरण केल्याने शिवशंभूभक्त संतप्त
धाड (Abu Azmi) : आ. अबु आझमी यांनी औरंगजेबाचे उदात्तीकरण करण्याच्या हेतूने औरंगजेब उत्तम प्रशासक असल्याचे विधान केले होते. शिवाय औरंगजेब क्रूर नव्हता, त्याच्या राजवटीत देशाचा जीडीपी २४ टक्के होता असेही अबु आझमी यांनी म्हटले होते. दरम्यान, त्यांच्या या वक्तव्याचा सर्वत्र निषेध व्यक्त होत आहे. धाडमध्ये देखील आज ५ मार्च रोजी आ. अबू आझमीबद्दल (Abu Azmi) संताप पाहायला मिळाला. शेकडो शिवभक्तांनी धाडच्या छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) चौकात औरंगजेबचा पुळका आलेल्या आ. अबू आझमी यांच्या पुतळ्याचे दहन केले. मुर्दाबाद मुर्दाबाद अबू आझमी (Abu Azmi) मुर्दाबाद, अशा घोषणाही शिवभक्तांकडून देण्यात येवून त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी देखील यावेळी करण्यात आली.
छत्रपती शिवाजी महाराज आमची प्रेरणा आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांनी लोककल्याणकारी स्वराज्य उभे केले. या स्वराज्याचे रक्षण धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांनी केले. मात्र, औरंगजेब शिवरायांच्या स्वराज्याला क्रमांक एकचा शत्रू समजत होता. स्वराज्य नेस्तनाभूत करण्यासाठी औरंगजेबाने शेकडो कट रचले. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांना (Chhatrapati Sambhaji Maharaj) हाल हाल करून मारले. एवढेच काय औरंगजेबाने तक्तासाठी स्वत:च्या बापाला कैद केले. स्वत:च्या भावांची कत्तल केली.
अशा क्रुरकर्माचे उदात्तीकरण करण्याच्या हेतूने भिवंडी मतदारसंघाचे (Abu Azmi) आ. अबु आझमी यांनी औरंगजेब क्रूर नव्हता. त्याच्या काळात देशाचा जीडीपी २४ टक्के होता, असे विधान करीत औरंगजेबाचा इतिहास चुकीच्या पद्धतीने रंगविण्यात येत असल्याचा दावा केला होता. त्यांच्या या विधानानंतर देशभरात तीव्र संतापाची लाट उसळली आहे. धाडमध्ये शिवप्रेमी शंभूभक्तांनी आज ५ मार्चच्या सकाळी ११ वाजता (Chhatrapati Shivaji Maharaj) छत्रपती शिवाजी महाराज चौकात एकत्रित येत प्रचंड घोषणाबाजी केली. तसेच आ.अबू आझमी (Abu Azmi) यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करीत त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी देखील शेकडो शिवप्रेमी शंभूभक्तांनी केली.
देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा
औरंगजेबाने स्वराज्य नेस्तनाभूत करण्याचे शेकडो कट रचले. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांना (Chhatrapati Sambhaji Maharaj) हाल हाल करून मारले. एवढेच काय तक्तासाठी स्वत:च्या बापाला कैद केले. स्वत:च्या भावांची कत्तल केली. तोच औरंगजेब आ. अबू आझमी (Abu Azmi) यांना शांततेचा दुत वाटत असून ते त्याचे उदात्तीकरण करत आहे. ही बाब म्हणजे तमाम शिवप्रेमी शंभूभक्तांच्या भावना दुखावणारी असून त्यांना शिवरायांच्या महाराष्ट्रातील विधिमंडळात जाण्याचा अधिकार नाही. त्यांचे सदस्यत्व रद्द करून त्यांच्याविरुद्ध देशद्रोहाचा गुन्हा दाखल झाला पाहीजे, अशी प्रतिक्रीया वैभवराजे मोहिते यांनी दिली.