परभणी/पाथरी (national highway) : शहरातील बसस्थानकासमोर राष्ट्रीय महामार्गाच्या लेन वर दिवसभर उभ्या केलेल्या गाड्यांमुळे वाहतुक वारंवार खोळंबल्या जात असुन बसस्थानकातुन बस बाहेर घेऊन येणाऱ्या महामंडळाच्या चालकाला वळण घेताना प्रत्येक वेळी मोठी कसरत करावी लागत आहे. पाथरी शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६१ वर बसस्थानकासमोर (bus station) असणाऱ्या दुकानांसमोर लावण्यात येणार्या दुचाकी ऐन (national highway) महामार्गावर पार्किंग करण्यात येत असल्याने दोन पदरी असणार्या लेन वरून वाहन घेऊन जाणे कठीण होऊन जात आहे. दर पाच ते दहा मिनिटाला बस स्थानकामधून परभणीच्या दिशेने वळण घेणाऱ्या बसला या ठिकाणी मोठ्या अडचणीचा सामना करावा लागतो. ऐन रस्त्यावर उभ्या गाड्यांमुळे हि स्थिती निर्माण होते.
पाथरी बसस्थानकासमोरील प्रकार
यादरम्यान बस स्थानकापासून सेंट्रल नाक्यापर्यंतची लेन वाहनांच्या रांगा लागल्याने खोळंबल्या जाते. या परिसरामध्ये पंचायत समिती कॉम्लेक्स, बाबा टॉवर सारखे व्यापारी संकुल असल्याने बाजारपेठेत खरेदीसाठी माणसांची मोठी गर्दी असते. याशिवाय परभणी नांदेडहून छत्रपती संभाजीनगर च्या दिशेने जाणाऱ्या रुग्णवाहिकांचेही प्रमाण जास्त आहे. वारंवार होणाऱ्या वाहतुछ कोंडी मुळे वाहन चालवने तर सोडा पण या रस्त्यावरून चालनेही अवघड होत असल्याचे चित्र दिवसभर पाहण्यास मिळते.
बसचालकांना नाहक त्रास
वाहतुकीस शिस्त लागावी म्हणुन या परिसरात (Pathari police) पाथरी ठाण्यातील वाहतुक शाखेचे पोलीस फिरताना दिसतात. परंतु कारवाई किंवा शिस्त लावण्यासाठी प्रयत्न केले जात नसल्याने शहरातुन जाणाऱ्या (national highway) महामार्गावरील वाहतुकीचे तिन तेरा वाजले आहेत. दरम्यान बसस्थानकासमोरील वाहतुक कोंडी सोडवण्यासाठी वाहतुक शाखेने पुढाकार घेत महामार्ग रस्त्यावर पार्किंग करणार्या दुचाकीस्वारांना शिस्त लावावी अशी मागणी प्रवाशी व नागरीकांमधुन होत आहे.