मंगरुळपीर (Washim) :- मद्यविक्रीच्या दुकानात भागीदारी देण्याचे सांगून पीडितेला शेलूबाजार येथे एका इमारतीत नेऊन गुंगीचे औषध देऊन अत्याचार (torture) करण्यात आल्याची घटना उघडकीस आल्याने शहरात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी पीडीतेच्या तक्रारीवरून २९ जुलै रोजी तालुक्यातील पिंपळगाव इजारा येथील विष्णू प्रल्हाद चव्हाण वय 53 वर्ष याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
५० टक्के भागीदारी देण्याचे सांगून त्याने महिलेकडून पाच धनादेश स्वाक्षरी करून घेतले
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार एका ४२ वर्षीय पीडितेने तक्रार दिली की, पिंपळगाव येथील विष्णू चव्हाण याचे मद्यविक्रीचे दुकान (Liquor store) आहे.या दुकानात ५० टक्के भागीदारी देण्याचे सांगून त्याने महिलेकडून पाच धनादेश स्वाक्षरी (Signature) करून घेतले. त्यानंतर भागीदारीचा विषय पूर्ण करण्यासाठी त्याच्या बहिणीची स्वाक्षरी घेण्यासाठी म्हणून त्याने पीडित महिलेला दुचाकीने शेलुबाजार येथे नेले व तिथे इमारतीत एका खोलीत बसवले आणि बहिणीला आणण्यासाठी जात असल्याचे सांगितले. काही वेळाने पाण्याची बॉटल घेऊन एकटाच परत आला. पाणी पिल्यानंतर गुंगी आल्याने आरोपीने अश्लील चाळे करणे सुरू केले. महिलेने विरोध केला असता, नकार दिल्यास तुझी बदनामी करेल, किंवा तुझ्या मुलांचा अपघात (Accident)घडवून मारून टाकीन अशी धमकी दिली. त्यामुळे घाबरून गेलेल्या आणि प्रतिकार करण्यास असमर्थ झालेल्या फिर्यदिचे त्याने लैगिंक शोषण करून अनैसर्गिक अत्याचार केला, अशा तक्रारीवरून पोलिसांनी कलम ३७६, ३७७, ४२०,५०६, भादवीनुसार गुन्हा दाखल केला.