परभणी/बोरी (Parbhani) :- जिंतूर तालुक्यातील नागठाणा शिवारात शेत आखाड्यावर झोपण्यासाठी गेलेल्या व्यक्तीला मारहाण करण्याची घटना दिनांक २१ नोव्हेंबर रोजी रात्री घडली होती. गंभीररित्या जखमी झालेल्या व्यक्तीचा संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात रुग्णालयात उपचारादरम्यान २६ नोव्हेंबर रोजी मृत्यू झाला.
मारहाण प्रकरणातील जखमीचा उपचारादरम्यान मृत्यू
नागठाणा येथील रावसाहेब अण्णासाहेब ठमके व तुळशीराम ठमके हे दिनांक २१ नोव्हेंबर रोजी रात्री जेवणाचा डब्बा घेऊन शिवारातील गट नंबर २९ मधील शेत आखाड्यावर झोपण्यासाठी गेले होते. जेवण करून दोघेही बोलत बसले रात्री दहा वाजण्याच्या सुमारास त्या ठिकाणी वैभव सुभाष ठमके हे तेथे आला व तुळशीराम ठमके यांना म्हनाला “तू मला तुझ्या आखाड्यावर येऊ नकोस म्हणला होता ना घे मी तुझ्या आखाड्यावर आलो असे म्हणत तुळशीराम ठमके यांना शिवीगाळ (Abusing) करत मारहाण करायला सुरुवात केली. वैभव ठमके हे तुळशीराम ठमके यांना मारहाण करत असल्याने रावसाहेब ठमके हे सोडवायला गेले असता वैभव ठमके याने रावसाहेब ठमके यांच्या डोक्यात लाकडाने मारहाण केल्याने रावसाहेब ठमके हे जमिनीवर कोसळले जमिनीवर कोसळल्यांचे पाहून वैभव ठमके हे त्या ठिकाणावरून पसार झाला.
डॉक्टरांनी तपासल्यानंतर प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगितले
तुळशीराम ठमके यांनी त्यांचे भाऊ भास्कर ठमके यांना फोन लावून सविस्तर माहिती सांगितली व आखाड्यावर बोलून घेतले. रावसाहेब ठमके हे बेशुद्ध (unconscious) अवस्थेत असल्याने रिक्षात घालून रावसाहेब ठमके यांना बोरी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी तपासल्यानंतर प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगितले. पुढील उपचारासाठी संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात रावसाहेब ठमके यांना दाखल करण्यात आले. २२ नोव्हेंबर रोजी तुळशीराम ठमके यांनी बोरी पोलीस ठाण्यात वैभव ठमके व एक अन्य आरोपी याच्या विरोधात फिर्याद दिली होती. मारहाण प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. रावसाहेब ठमके यांच्यावर संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात उपचार सुरू असताना २६ नोव्हेंबर रोजी त्यांचा मृत्यू (Death) झाला.
न्यायालयाने चार दिवसाची पोलीस कोठडी सुनावली
बोरी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील गोपीनवार व त्यांच्या पथकाने वैभव ठमके याला मानवत येथून ताब्यात घेतले घेतले व २९ नोव्हेंबर रोजी न्यायालयामध्ये हजर केले. न्यायालयाने चार दिवसाची पोलीस कोठडी सुनावली. या प्रकरणातील अन्य आरोपी पोलिसांच्या हत्ती अद्यापही लागला नाही. पोलिस अध्यक्षांनी लक्ष देऊन अन्य आरोपीचा तपास करून त्याला तात्काळ त्या ताब्यात घ्यावे अशी मागणी मृतकाच्या नातेवाईकांनी केली आहे. वैभव ठमके याच्या विरोधात गुन्हा (Crime) दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील गोपीनवार हे करीत आहे.