परभणी (Parbhani):- सुन, मुलाच्या भांडणात सुनेच्या माहेरच्या मंडळींनी एका ५० वर्षीय महिलेस शिवीगाळ करत मारहाण केली. ही घटना जिंतूर तालुक्यातील हलविरा तांडा येथे घडली. या प्रकरणी चारठाणा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल (Filed a case)करण्यात आला आहे.
कमल पवार यांनी तक्रार (complaint) दिली आहे. फिर्यादीच्या मुलगा आणि सुनेमध्ये भांडण झाले. यात सुनेने घडला प्रकार माहेरच्या मंडळींना सांगितला. त्यानंतर माहेरची लोक फिर्यादीच्या घरी आले. त्यांनी फिर्यादीला शिवीगाळ करू मारहाण (beating) केली. या प्रकरणी लक्ष्मीबाई राठोड, मोहन राठोड, बालाजी राठोड, मेघा पवार या चौघांवर चारठाणा पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस अधिक तपास करत आहेत.