वर्धा(Wardha):- धनवंतरी नगर वरुड वरून सेवाग्राम मार्गे शिंदि रेल्वे करिता जाण्यासाठी निघालेले शिक्षक अविनाश कांबळे व त्यांची पत्नी सौ संध्या कांबळे हे दोघे आपल्या व्हॅगनार कार (Wagner car) नी कार नंबर एम एच एच 32 वाय 22 15 .यांनी शनिवारी सकाळी साडे अकरा वाजताच्या दरम्यान सिंधी रेल्वे करिता निघाले असता वघाळा सामोरील टाकळी किटे फाट्यावरती सेलू कडून येणारी नवीन टाटा ये आय नी व्हॅगनार कारला जबर धडक (hit hard) दिली.
वाहन वेगाने येत असल्याने येथे अपघाताचे प्रमाण वाढले
यामध्ये कारमधे बसून असलेली महिला संध्या अविनाश कांबळे हिला जबर दुखापत झाली. तिला उपचाराकरिता सेवाग्राम (Sevagram) येथे नेण्यात आले. काही दिवसापूर्वी या रस्ताचे काम करण्यात आले या ठिकाणी अनेक घटना घडत असुन रस्ता बनवणारी कंपनी कुठलीही खबरदारी घेत नसल्यामुळे येथे अपघाताचे प्रमाण वाढले आहे. येथे रस्त्यावर देखील वाळू पडून असून घसरून पडण्याचे प्रमाण वाढले आहे. सेलू मार्गाकडून येणारे वाहन वेगाने येत असल्याने येथे अपघाताचे प्रमाण वाढले त्यामुळे येथे ब्रेकरची (breaker) देखील मागणी जोर धरू लागली आहे. या घटनेची माहिती सेलू पोलिसांना देण्यात आली असून पुढील तपास सेलू पोलीस करीत आहे.




