देशोन्नती वूत्तसंकलन
चिखली (Ganpati Visarjan) : अकोला येथून चिखली येथे गणपती विसर्जनाच्या (Ganpati Visarjan) मिरवणुकीसाठी डीजे घेऊन येणाऱ्या वाहनाला 17 सप्टेंबर रोजी चिखली अमरापुर रस्त्यावरील दहिगाव फाट्याजवळ अपघात (DJ vehicle Accident) झाल्याने यामध्ये एक जण ठार झाला असून दहा जण जखमी झाले आहे जखमीं पैकी 4 जणावर चिखली येथील प्राथमिक उपचारानंतर बुलढाणा रेफर करण्यात आले आहे.
चिखली येथील गणपती विसर्जन (Ganpati Visarjan) मिरवणुकीसाठी अकोला येथील डीजे वाहन चिखलीकडे येत असताना 17 सप्टेंबर च्या साडेचार वाजेच्या सुमारास चिखली अमडापूर रोडवरील दहिगाव फाट्याजवळ अपघात झाला. (DJ vehicle Accident) अपघातात तील जखमींना वाचवण्यासाठी 108 क्रमांकावर फोन केल्यानंतर उदयनगर आणि साखरखेर्डा येथील दोन्ही ॲम्बुलन्स त्यांच्या मदतीला. धावून आल्या उपस्थित नागरिकांनी जखमींना अंबुलान्स मध्ये मध्ये टाकून त्यांना चिखली येथील ग्रामीण रुग्णालयामध्ये भरती केले. यातील प्रवीण कैलास वानखेडे व 40 गायगाव तालुका बाळापूर जिल्हा अकोला हा जागीच ठार झाला होता.
तर अजय मधु नागर वय २८ वर्ष, महेश सुधाकर गवई वय 22 वर्ष ,जावेद खान शब्बीर खान चम 30 वर्षे, शेख दानीश गोवा तसवीर वय 22, नागेश संतोष वानखेडे वय 23 वर्षे, प्रवीण दादाराव खंडारे वय २५ वर्ष, नंदु शंकर साळवे वय 20 वर्ष, पील विनोद चवरे 20 वर्ष ,प्रेमानंद पुंडलीक केदारे वय 20 वर्ष, श्रेयस प्रमोद आमटे १८वर्ष आधी जखमेवर चिखली सामान्य रुग्णालयामध्ये डॉक्टर सय्यद उमर यांच्या नेतृत्वाखालील डॉक्टरांनी प्राथमिक उपचार केले व यातील चार जण फॅक्चर असल्याने त्यांना बुलढाणा रेपर केले आहे.
फिर्यादी सुजित कैलास वानखेडे वय 28 वर्ष रा गायगाव तालुका बाळापूर जिल्हा अकोला यांच्या तक्रारीवरून आरोपी -शेख अल्तमश शाहबुदिन रा अकोट फैल जिल्हा अकोला यांने त्याचे ताब्यातील वाहन क्रमांक MH 16 Q1150 वाहन भरगाव वेगाने व निष्काळजीपणाने चालवून सदर वाहन पलटी करून यातील मृतक याचे मरणास कारणीभूत झाला आहे. वरून अमडापूर पोलीसांनी कायमी अपन -0321 /2024 कलम 281,106(1),106(2),125(a), 125(b) bns सदरचा गुन्हा दाखल केला आहे. (DJ vehicle Accident) घटनेचा पुढील तपास अमडापूर पोलीस करत आहेत