पालम (Parbhani):- बांधकामावर पाणी मारत असताना दुसर्या मजल्यावरुन पडल्याने जखमी होवून एका २२ वर्षीय युवकाचा मृत्यू (Death) झाला. ही घटना गुरुवार २३ मे रोजी सकाळी साडे सात वाजेच्या सुमारास पालम शहरामध्ये घडली.
बांधकामावर पाणी मारत असताना झाला अपघात
शहरातील गंगाखेड रोडवर एका इमारतीचे बांधकाम सुरू आहे. या इमारतीच्या गॅलरीमध्ये उभे राहून बांधकामावर पाणी मारत असताना अर्जून अमरचंद कुरील वय २२ वर्ष हा युवक दुसर्या मजल्यावरुन खाली पडला. यामध्ये युवकाच्या डोक्याला जबर मार लागुन रक्तस्त्रास(blood loss) सुरू झाला. नातेवाईकांनी त्याला तात्काळ उपचारासाठी नांदेडकडे नेले. मात्र रस्त्यातच युवकाचा मृत्यू झाला. युवकाच्या पश्चात आई – वडिल, बहिण, भाऊ असा परिवार आहे. इमारतीच्या अगदी जवळून महवितरणची(Distribution) उच्चदाब वाहिनी गेलेली आहे. अर्जून हा अत्यंत काळजीपूर्वक बांधकामावर पाणी देत होता. मात्र त्याचा पाय घसरल्याने दुसर्या मजल्यावरुन खाली पडला.
टेम्पो- अॅपे अपघातात एकाचा मृत्यू झाला तर तीन जखमी
बोरी : बोरी ते वस्सा रस्त्यावरील जिनिंग जवळ टेम्पो- अॅपे अपघातात एकाचा मृत्यू झाला तर तीन जखमी झाले. ही घटना मंगळवार २१ मेच्या सकाळी साडे दहा वाजता घडली. टेम्पो क्रमांक एम.एच. ४५. ६९९७ या वाहनाने अॅपे- अॅटोला धडक दिली. यामध्ये भगवान रामराव चव्हाण वय ५५ वर्ष रा. नागणगाव हे जखमी होवून उपचारा दरम्यान त्यांचा मृत्यू तर इतर तीन प्रवाशी देखील जखमी झाले आहेत. या प्रकरणी कृष्णा चव्हाण यांच्या फिर्यादीवरुन टेम्पो चालक माणिक जगन्नाथ चव्हाण याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोउपनि. अनिल खिल्लारे करत आहेत.