गंगाखेडचा खादगाव शिवारातील घटना
परभणी/गंगाखेड (Gangakhed Accident) : अज्ञात वाहनाच्या अपघातात हरंगुळ यात्रेला जाणाऱ्या चौदा वर्षीय बालकाचा मृत्यू झाल्याची (Gangakhed Accident) घटना आज सकाळी ११ वाजेच्या सुमारास गंगाखेड तालुक्यातील खादगाव शिवारात घडली आहे.
माहितीनुसार, गंगाखेड तालुक्यातील खादगाव येथील अफरोज ताज खान पठाण वय १४ वर्ष हा बालक सकाळी हरंगुळ येथे भरणाऱ्या यात्रेला जात असताना सकाळी ११ वाजेच्या सुमारास खादगाव शिवारातील व्यंकटी फड यांच्या शेताजवळ अज्ञात वाहनाच्या चालकाने त्याच्या जवळील वाहन भरधाव वेगात हलगर्जी व निष्काळजीपणाने चालवून हरंगुळ यात्रेला जाणाऱ्या अफरोज ताज खान पठाण यास धडक देऊन पळून गेला. (Gangakhed Accident) अपघात झाल्याची माहिती समजताच अफरोज पठाण याचे चुलत आजोबा बाबू पठाण, अर्शद पठाण, रमजान शिकुर पठाण, संभुदेव फड आदींनी घटनास्थळी धाव घेऊन गंभीर जखमी अवस्थेतील अफरोज पठाण यास गंगाखेड उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले.
निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ कल्पना घुगे, परिचारिका अंकिता कदम यांनी त्याच्यावर प्रथमोपचार करून परभणी येथे हलविले असता त्याचा मृत्यू झाल्याने बाबू उस्मान पठाण यांनी गंगाखेड पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून (Gangakhed Accident) अज्ञात वाहन चालकाविरुद्ध मृत्यूस कारणीभूत ठरल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक संदीप गडदे हे करीत आहेत.