पवनी(Bhandara):- लग्नसमारंभ (wedding ceremony)आटोपून पवनी येथून स्वगावाकडे जात असलेल्या दुचाकीस्वार तरुण शेतकर्यास मागून जाणार्या अज्ञात वाहनाने (Vehicle) चिरडले. त्यात दुचाकीस्वार जागीच गतप्राण झाला. सदर अपघात दि.१२ जून रोजी रात्री ८.१५ वाजतादरम्यान पवनी वैनगंगा पुलावर घडला. देवीदास श्रावण मासुरकर (४२) रा.पालोरा, असे मृतकाचे नाव आहे.
पवनी वैनगंगा पुलावरील घटना
पवनी तालुक्यातील पालोरा येथील तरुण शेतकरी (Farmer) देवीदास मासुरकर हा पवनी येथे लग्नसोहळा असल्याने मोटारसायकलने गेला होता. कार्यक्रम आटोपून मोटारसायकलने गावाकडे परत जात असतांना पवनी वैनगंगा पुलावर मागेहून जाणार्या अज्ञात वाहनाने जबर धडक (hit hard)दिली. त्यात त्याचा जागीच मृत्यू (Death)झाला. अपघाताची माहिती पवनी पोलीसांना मिळताच पवनीचे पोउपनि रहाटे यांनी आपल्या पोलीस ताफ्यासह घटनास्थळ गाठले. घटनेचा पंचनामा करुन प्रेत शवविच्छेदनाकरीता(Autopsy) पाठविण्यात आले. मृतक याचे पश्चात पत्नी, एक मुलगा, दोन मुली आहेत. त्याच्या अपघाती मृत्यूने गावात हळहळ व्यक्त केली जात आहे. सदर घटनेची नोंद पवनी पोलीसात केली असून घटनेचा पुढील तपास ठाणेदार निलेश ब्राम्हणे यांचे मार्गदर्शनात पोउपनि रहाटे करीत आहेत.