पार्डी-राजवाडी पुलावरून ट्रॅक्टरची ट्रॉली कोसळली
नांदेड(Nanded):- मुदखेड तालुक्यातील पार्डी वैजापूर येथील ट्रॅक्टर घेऊन चौघेजण सेंद्रिय खत भरण्यासाठी मुदखेडकडे येत असतांना पांढरवाडी रस्त्यादरम्यान असलेल्या पार्डी-राजवाडी पुलावरून अचानकपणे ट्रॅक्टरची ट्रॉली (Tractor trolley) खाली कोसळल्यामुळे २७ मे रोजी सकाळी झालेल्या अपघातात तेजस अशोक शिंदे वय १३ वर्षे, रा.तिरकसवाडी या अल्पवयीन बालकाचा जागीच मृत्यू झाला. तर १८ वर्षीय बालाजी मारोती शिंदे व १७ वर्षीय रामेश्वर मारोती साबळे दोघेही रा. तिरकसवाडी हे जखमी झाले आहेत. मुदखेड – पांढरवाडी रस्त्यादरम्यान असलेल्या पुलावर अरुंद रस्त्यामुळे हा अपघात (accident)झाला असल्याचे बोलल्या जात आहे.