अकोट(Akot):- तालुक्यातील अंजनगाव मार्गावर असलेल्या नाल्याजवळ दोन दुचाकींची समोरासमोर झालेल्या धडकीमध्ये तीन जण गंभीर जखमी झाल्याची घटना ९ मे च्या सायंकाळच्या सुमारास घडली.
अंजनगावकडे जाणार्या दुचाकीची धडक
अंजनगावकडून अकोटकडे येणारी दुचाकी व अकोटकडून अंजनगावकडे जाणार्या दुचाकीची धडक(Bike collision) झाली. यामध्ये तीन जण गंभीर जखमी झाले. जखमींना अकोट येथील रुग्णालयात आणले असता, ते युवक गंभीर जखमी असल्याने त्यांना अकोला येथे हलविण्यात आले आहे. घटना घडताच वाहतुकीची कोंडी (Traffic jams) निर्माण झाली होती. मात्र अकोट ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन वाहतूक मोकळी करून दिली.