मानवत(Parbhani):- रस्त्यावर उभ्या असलेल्या ट्रॅक्टर ट्रॉलीला धडकुन दुचाकी चालक १८ वर्षीय युवकाचा मृत्यु (Death of a young man) झाला. ही घटना बुधवार २९ मे रोजी सायंकाळी साडे सात वाजेच्या सुमारास मानवत ते नागरजवळा रोडवर घडली. युवकाच्या अपघाती मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी ट्रॅक्टर(tractor) चालकावर मानवत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मानवत ते नागरजवळ रोडवरील घटना; ट्रॅक्टर चालकारवर गुन्हा दाखल
पांडूरंग बालासाहेब होंगे वय १८ वर्ष रा.नागरजवळा असे मृतकाचे नाव आहे.याप्रकरणी विठ्ठल बाबासाहेब होंगे यांनी तक्रार (Complaint) दिली आहे. आरोपी ट्रॅक्टर क्रमांक एमएच २१ डि ३५६८ च्या चालकाने त्याच्या ताब्यातील वाहन रोडवर धोकादायक स्थितीत कोणतीही काळजी न घेता उभे केले होते. या ट्रॅक्टर ट्रॉलीली धडकून पांडूरंग होंगे याचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच मानवत पोलीस ठाण्याचे सपोनी संदिप बोरकर, पोउपनी पाटील, पोह भारत नलावडे, पोका बंकट लटपटे, विजय लबडे, शिंदे यांनी तात्काळ घटनास्थळी भेट देवून मृतदेह (dead body)ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी(Autopsy) ग्रामीण रुग्णालयात(Hospital) पाठविला.प्रकरणाचा तपास पोउपनी पाटील करत आहेत.
परभणी तालुक्यातील झरी जवळ आढळला मृतदेह
परभणी तालुक्यातील झरी गावाजवळील खानापूर शिवारात एका ५० वर्षीय इसमाचा मृतदेह बुधवार २९ मे रोजी सायंकाळी सहाच्या सुमारास आढळून आला.घटनेची माहिती मिळताच ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जयप्रकाश गुट्टे, पोलीस अंमलदार एस.डी. हाके, आसाराम दवंडे यांनी घटनास्थळी धाव घेतली. मृतदेह ताब्यात घेत शव विच्छेदनासाठी पाठविला. मृतकाजवळ त्याची ओळख पटेल असे काहिही मिळून आले नाही. पोलीस मृतकाची ओळख पटविण्याचे काम करत आहेत.