कारंजा(Washim):- भरधाव दुचाकीने धडक दिल्याने रस्त्याने पायदळ जाणाऱ्या महिलेचा जागीच मृत्यू झाला. कारंजा मूर्तिजापूर मार्गावर सोमवारी 13 मे रोजी रात्री 8 वाजताच्या दरम्यान ही घटना घडली. मालब झिंगराजी बनसोड वय 70 वर्ष असे अपघातात(accident) मृत्यू झालेल्या महिलेचे नाव असून ती कारंजा शहरातील माळीपुरा भागातील रहिवासी होती.
दुचाकी वरील दोघेजण फरार
सूत्रांकडून प्राप्त माहितीनुसार मृत महिला रस्त्याने पायदळ चालत असताना शहरालगतच्या वेदांत शाळेजवळ एका दुचाकीने तिला धडक (strike) दिली. त्यामुळे ती खाली पडल्याने तिच्या डोक्याला जबरदस्त मार लागला. अपघाताच्या घटनेनंतर काही नागरिकांनी तिला प्राथमिक उपचारासाठी कारंजा उपजिल्हा रुग्णालयात (hospital)दाखल केले, परंतु तपासणी करताना डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. अपघात स्थळावर एक दुचाकी (bike) खाली पडलेल्या अवस्थेत आढळल्याची आणि दुचाकी वरील दोघेजण फरार झाले असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. दरम्यान, अपघाताच्या पोलिसातील नोंदीबाबत मात्र तपशील प्राप्त झाला नाही.