परभणी/पाथरी (Parbhani):- जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या वतीने खातेदार व कर्जदार यांचे विमा संरक्षण केल्या जात असुन बँकेच्या पाथरी शाखेतील खातेदार असताना अपघातात मृतक झालेल्या एका शिक्षक खातेदाराच्या वारसदारांना तात्काळ २५ लाखाचा विमा वाटप करण्याची कार्यवाही (Proceedings)बँकेच्या वतीने करण्यात आली आहे. गुरुवारी बँकेत मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या हस्ते विम्याचा धनादेश वारसांना देण्यात आला आहे.
विद्युत प्रवाहाच्या संपर्कात आल्याने अपघाती मृत्यू
शहरातील बी.बी.फातेमा हायस्कूल येथे कार्यरत शिक्षक अब्दुल वाजिद अन्सारी यांचा मागील काही दिवसांपुर्वी विद्युत प्रवाहाच्या(electric current) संपर्कात आल्याने अपघाती मृत्यू झाला होता. मृतक शिक्षक हे जिल्हा बँकेच्या पाथरी शाखेत खातेदार तसेच कर्जदार होते. दरम्यान बँकेच्या वतीने पगारदार शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचा रुपये २ २५ लाखाचा अपघाती विमा बँके (Insurance Bank)कडून काढलेला होता. त्यामुळे मृतक खातेदारास विमा सुरक्षा कवचे चा लाभ झाला. गुरुवार ४ जुलै रोजी बँकेच्या पाथरी शाखेत एका कार्यक्रमात मृतक शिक्षक अब्दुल वाजिद अन्सारी यांच्या वारसदार श्रीमती नाझिमा बेगम अब्दुल वाजिद यांना २५ लाखाचा धनादेश बँकेचे संचालक दत्तराव मांयदळे, बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी व्ही .आर . कुरुंदकर, मुंजाजी भाले पाटील, जी .डी . शिंदे यांच्या उपस्थितीत देण्यात आला.
पुढील वर्षी पासुन ५० लाखांचे विमा संरक्षण
यावेळी पाथरी नियंत्रण अधिकारी दिपक गवारे ,तालुका लोन ऑफिसर डी . एस . डाफुरे , शाखा व्यवस्थापक एस. एस . मगर, बँकेचे अधिकारी महेश जावळे , आर . आर .सोनवणे , लक्ष्मीकांत दीक्षित ,वासुदेव फुटाणे , अमित पारवे , शिक्षक संघटनेचे पदाधिकारी रविकांत जोजारे , सीताराम नाईक , व्ही .एम . चट ,श्यामसुंदर शेळके ,दुगाणे सुशील देशमुख, बँकेचे व्यवस्थापक डी .आर . काळे , आदी शिक्षक उपस्थित होते . कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नवनाथ कोल्हे यांनी केले .
ऑडिट ए वर्ग प्राप्त केले असुन ठेविचा अठराशे कोटीचा टप्पा पार
सतत तिसऱ्या वर्षी बँकेने ऑडिट ए वर्ग प्राप्त केले असुन ठेविचा अठराशे कोटीचा टप्पा पार केलेला आहे. बँक शिक्षक खातेदाराला गृहकर्ज, शैक्षणिक कर्ज, पगारदार खातेदारांना अधिकच्या सुविधा देत आहे. पुढील काळात शिक्षक खातेदारांना विम्याचे ५० लाखाचे सुरक्षा कवच प्रदान करण्याचा प्रयत्न जिल्हा बँक करणार आहे. शिक्षकांना पुढील वर्षी पासुन रुपये ५० लाखाचा विमा सुरक्षा कवचासह जास्तीत जास्त सुविधा कशाप्रकारे देता येईल यासाठी संचालक मंडळ प्रयत्न करीत आहे .