परभणी शहरातील वसमत रोडवरील घटना ; मयत युवक छत्तीसगड मधील
परभणी (Accidental death) : शहरातील वसमत रोडवर असलेल्या एका पेट्रोल पंपावर बोअरवेल मशीन असलेले ट्रक उभा होता. या ट्रकखाली बोअरवेलवरील मजुर झोपलेले होते. यातीलच एका मजुराच्या डोक्यावरुन बोअरवेल ट्रकचे चाक जावून झालेल्या अपघातात सदर मजुराचा मृत्यू झाला. ही (Accidental death) घटना बुधवार ६ नोव्हेंबर रोजी पहाटे पाच ते सहाच्या दरम्यान घडली.
या अपघाताविषयी पोलीस सुत्रांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, मानसिंह समारुसिंह कुसरो असे मयत मजुराचे नाव आहे. सदर मजुर हा बोअरवेल ट्रकवर कामाला होता. नेहमी प्रमाणे मजुर वाहनाखाली झोपलेले होते. बुधवारी पहाटे चालकाने मजुरांना उठविले. मात्र एक जण ट्रकखालीच होता. या मजुराच्या डोक्यावरुन ट्रकचे चाक जावून आपघात झाला, यात त्याचा मृत्यू झाला. (Accidental death) घटनेची माहिती मिळताच नवा मोंढा पोलीस ठाण्याचे पोनि. शरद मरे, पोउपनि. इंगोले, पोलीस अंमलदार चुडावकर, यादव, शेटे यांनी घटनास्थळी धाव घेतली. मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी पाठविला. सदर प्रकरणी नवा मोंढा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.