परभणी (Parbhani):- गंभीर जखमी अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या एका ३० वर्षीय युवकाचा उपचारा दरम्यान शनिवारी पहाटे मृत्यू झाला. मृत युवक हा शहरातील मदीना नगर येथील रहिवाशी आहे. युवकाच्या मृत्यू मागे घातपात असून त्या अनुषंगाने पोलिसांनी तपास सुरू केला आहे.
उपचारा दरम्यान त्याचा मृत्यू
या घटने बाबत पोलीस सुत्रांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, खदीर खान दस्तगीर खान वय ३० वर्ष असे मृतकाचे नाव आहे. मृतक हा ऑटो चालक असून मदीना नगर येथील रहिवाशी आहे. आठ दिवसांपूर्वीच तो परभणी शहरात आला होता. शुक्रवार ७ जून रोजी रात्री आठच्या सुमारास घराबाहेर पडला. मध्यरात्रीच्या सुमारास त्याला गंभीर (severe) अवस्थेत आयेशा कॉलनी येथून रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारा दरम्यान त्याचा मृत्यू(death) झाला. यानंतर मोठ्या प्रमाणात नातेवाईक जिल्हा सामान्य रुग्णलयात दाखल झाले. नानलेपठ पोलीस ठाण्याचे पोनि. चितांबर कामठेवाड, सपोनि. दोनकलवार, सपोनि. पुंड यांच्या पथकाने रुग्णालयात(Hospital) धाव घेतली. युवकाच्या अंगावर, डोके, पाठ, हात- पायावर मारहाणीच्या जखमा आहेत. त्यावरुन युवकाच्या मृत्यू मागे घातपात असून त्या दृष्टीने पोलिसांनी तपास सुरू केला आहे.