अज्ञात वाहनाच्च्या धडकेत दुचाकीस्वार युवक ठार!
– खेरडा ,सारोळा ( खु ) फाट्या दरम्यान घडला अपघात
– सोमवारी रात्रीची घटना
परभणी/पाथरी (Pathari Accident) : तालुक्यातून जाणाऱ्या राज्य महामार्ग व राष्ट्रीय महामार्गावर अपघाताच्या सतत घटना घडत असून यामध्ये अनेकांनी आपला जीव गमावला आहे. सोमवारी रात्री राज्य महामार्ग ६१वर घडलेल्या (Pathari Accident) अपघातात मरडसगाव येथील २२ वर्षीय युवक जागीच ठार झाल्याची घटना घडली असून या अपघातात एक जण गंभीर जखमी झाला आहे.
या (Pathari Accident) अपघाता विषयी मिळालेल्या माहितीनुसार तालुक्यातील मर्डसगाव येथील युवक गोविंद उद्धव काळे ( वय २२ ) व अशोक अजय काळे वय ( २० ) हे दोघे युवक सोमवार १३ जानेवारी रोजी रात्री दुचाकी क्रं एमएच १५ एचके ०६१८ वरून पाथरी येथे उर्स पाहण्यासाठी निघाले होते. रात्री ८.३० वा . सुमारासराज्य महामार्ग क्रमांक ६१ वर सारोळा (खु) खेर्डा फाट्या दरम्यान त्यांच्या दुचाकीला अज्ञात वाहनाने धडक दिली.
यावेळी झालेल्या (Pathari Accident) अपघातात दुचाकीवरील युवक गोविंद उद्धव काळे ( वय २२ ) त्याचा जागेत मृत्यू झाला तर अशोक अजय काळे वय ( २० )हा गंभीर जखमी झाला. अपघातानंतर जखमीला परभणी येथे पुढील उपचारासाठी पाठवण्यात आले असून, मयताचे पाथरी ग्रामीण रुग्णालयामध्ये शवविच्छेदन करण्यात आले आहे. दरम्यान या अपघात प्रकरणी अज्ञात वाहन चालकाविरुद्ध पाथरी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.