यवतमाळ (Yawatmal accident ) :- नागपूर – यवतमाळ – तुळजापूर महामार्गावर महामार्ग प्राधिकरणाने एक सदोष दुभाजक अत्यंत चुकीच्या पद्धतीने ठेवले असून, या महामार्गावर सलग दुसर्या दिवशी अपघात झाला आहे. हे दुभाजक अपघातासाठी (Accident) तर ठेवले नाही ना? असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. सतत होणार्या अपघातामुळे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या कामाबद्दल नागरिकांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे. सोमवारी सायंकाळी ६.३० च्या दरम्यान या राष्ट्रीय महामार्गावर आर्णी कडून येणारे एक चारचाकी वाहन महामार्ग प्राधिकरणाच्या वतीने ठेवण्यात आलेल्या सदोष दुभाजकावर धडकले.
इ महामार्ग प्राधिकरणाने सदोष दुभाजक ठेवले जिवघेण्यासाठी?
या अपघातात वाहनाचा पुढचा भाग पुर्णपणे दबला आहे . या वाहनांमध्ये तिन नागरिक असल्याची माहिती आहे . रात्री उशिरापर्यंत याप्रकरणी कुठलीही तक्रार पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली नव्हती.
नागपूर-यवतमाळ -तुळजापूर महामार्गावर रविवारी दुपारी ५.३० च्या दरम्यान असलेल्या सदोष दुभाजकावर धडकून दोन दुचाकीस्वारांचा मृत्यू (Death) झाला होता. याठिकाणी सतत अपघाताची मालिका सुरू असून नागपूर-यवतमाळ-तुळजापूर राष्ट्रीय महामार्ग क्र. ३६१ तयार करताना यवतमाळ शहराबाहेरचा रस्ता सदोष पद्धतीने तयार करण्यात आला आहे . महामार्ग प्राधिकरणाने केलेल्या या मोठ्या चुकीच्या कामामुळे आता शहराबाहेर दोन उड्डाणपूल (Flyover) बांधून ही चुक सुधारण्याचा प्रयत्न सुरू आहे. मात्र सुरू असलेल्या कामाच्या ठिकाणी सुरक्षिततेच्या कोणत्याही उपाययोजना करण्यात न आल्याने हा रस्ता मोठा अपघात प्रवणस्थळ झाला असून याठिकाणी सलग दुसर्या दिवशी मोठा अपघात घडला आहे. या ठिकाणी दररोज अपघात होत आहेत. रविवारी सायंकाळी आर्णी मार्गावर वनवासी मारोती चौकात उड्डाणपुलाचे काम सुरू असलेल्या ठिकाणी दुचाकी सदोष दुभाजकाला धडकल्याने झालेल्या अपघातात दोन तरुण जागीच ठार झाले.
याच मार्गावर उड्डाणपुलाचे काम आणि बाजूने रेल्वे बोगद्याचे काम सुरू आहे. येथील तात्पुरते दुभाजक चुकीच्या पद्धतीने ठेवले आहे. त्यावर पुरेसे रिफ्लेक्टर बसविलेले नाही. हे दोघे दुचाकी (क्र.एमएच-२९-एएस-९८१२) ने यवतमाळकडे येत होते. या मार्गावर उड्डाणपुलाचे काम आणि बाजूने रेल्वे बोगद्याचे काम सुरू आहे.