वाहन चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्यामुळे अपघात घडला!
मानोरा (Accident) : शेंदुरजना आढाव-धानोरा रस्त्यावर जंगली जनावर अचानक मोटर सायकल समोर आल्यामुळे दुचाकी वाहन चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्यामुळे दि. 5 जुलै रोजी अपघात घडला. सदर बाब प्रहार सेवक यांना माहिती होताच आरोग्यवर्धिनी केंद्राला कळवून वाहन बोलावून अपघातग्रस्त रुग्णावर उपचार करण्यात आले.
अपघात ग्रस्त व्यक्तीला उपचारासाठी दवाखान्यात पाठविण्यात आले!
सविस्तर असे की, वाशीम येथील रहिवाशी कामासाठी दु-चाकीने आला असताना शनिवारी शेंदुरजना – धानोरा रस्त्यावर जंगली जनावर मोटर सायकल समोर आल्याने गाडीवरील नियंत्रण सुटून अपघात झाला. रस्त्याच्या कडेला अपघात ग्रस्त व्यक्ती बेशुध्द (Unconscious) अवस्थेत पडून असल्याची माहिती प्रहार सेवक मित्र मंडळींना कळताच युवकांनी घटनास्थळ गाठले. भ्रमणध्वनी करून आरोग्यवर्धिनी केंद्राला (Arogyavardhini Center) कळवून वाहनाला पाचारण करून अपघात ग्रस्त व्यक्तीला उपचारासाठी दवाखान्यात पाठविण्यात आले. शुध्दीवर आल्यावर अपघात ग्रस्त व्यक्तीला विचारणा केली असता, वाशिमचे असल्याचे त्यांनी सांगितले.