स्कार्पिओ गाडी व एक ट्रॅक्टर पोलिसांनी केले जप्त
कळमनुरी (Sand smuggler attack) : शिवारात अवैध रेती वाहतूक करणार्या वाहनावर कारवाई करीत असताना महसुलच्या पथकावर रेती तस्करांनी हल्ला केल्याने तलाठ्याचा अंगठा मोडून जखमी केल्याची घटना १८ डिसेंबरच्या मध्यरात्री घडली होती. यानंतर याप्रकरणी कळमनुरी पोलिसात सात जणांवर गुन्हा नोंदविण्यात आला होता यानंतर या गुन्ह्यातील पाच आरोपींना कळमनुरी पोलिसांनी अटक केली व कळमनुरी न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने पाच आरोपींना पाच दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे.
या बाबत अधिक माहिती अशी की, १८ डिसेंबर च्या मध्यरात्री कळमनुरी तालुक्यातील नांदापूर शिवारातून एका ट्रॅक्टरमधून अवैध वाळुची वाहतूक होत असल्याची माहिती महसुलच्या पथकाला मिळाल्याने १८ डिसेंबरला मध्यरात्री कळमनुरी-हिंगोली रस्त्यावर कळमनुरी जिल्हा परिषद शाळेसमोर एका ट्रॅक्टरमधून अवैधरित्या गौण खनिज वाहतूक करीत असताना पथकाच्या निदर्शनास आले. त्यावरून (Sand smuggler attack) महसुलच्या पथकाने उमरा फाटा येथे ट्रॅक्टरला थांबविण्यात आले. यावेळी तलाठी एकनाथ कदम, विशाल पतंगे यांना ट्रॅक्टरवरून बसवून पोलीस ठाण्यामध्ये नेण्यास सांगितले.
हे ट्रॅक्टर कळमनुरी शिवारात आले असता एका स्कॉर्पिओ वाहनातून आलेल्या सात जणांनी ट्रॅक्टरला अडवून (Sand smuggler attack) महसुलच्या पथकावर हल्ला चढविला. ज्यामध्ये तलाठी कदम, पतंगे यांच्या गच्चीला धरून ट्रॅक्टरवरून खाली उतरविण्यात आल्यानंतर पथकावर काठीने हल्ला चढविला. यावेळी कदम यांनी काठीचा वार हाताने अडविण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्या अंगठ्याला गंभीर दुखापत झाली. त्यानंतर रेती तस्करांनी रेती जमिनीवर सांडून ट्रॅक्टरसह पळ काढला. याप्रकरणी मंडळ अधिकारी प्रेमदास चव्हाण यांनी कळमनुरी पोलिसात दिलेल्या फिर्यादीवरून प्रकाश गणपत गिराम, शुभम प्रकाश गिराम, आसिफ मुक्तार शेख, ओम प्रकाश गिराम सर्व रा.मसोड, दत्ता मोहोरे आणि इतर दोन अनोळखी अशा एकूण सात आरोपींवर दरोडा घालणे व विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला.
यानंतर जिल्हा पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे, अप्पर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक मोहन भोसले, सहाय्यक पोलीस निरीक्षक रघुनाथ शेवाळे, भिंगारे,पोलीस उपनिरीक्षक संतोष इंगळे, जमादार प्रशांत शिंदे शशिकांत भिसे, किशोर खिल्लारे यांच्या पथकाने या पुण्यातील पाच आरोपींना अटक करून त्यांच्याकडून पुण्यात वापरण्यात आलेली एक ट्रॅक्टर एक स्कार्पिओ गाडी असा मुद्देमाल जप्त केला व १९ डिसेंबर रोजी पाच आरोपींना कळमनुरी न्यायालयासमोर हजर केले व आरोपींना पाच दिवसाची पोलीस कोठडी मागितली यावेळी सरकारी सहाय्यक अभियोक्ता अॅड.अनिल इंगळे यांनी सरकारच्या बाजूने न्यायालयासमोर जोरदार युक्तिवाद केला त्यानंतर न्यायालयाने सदर गुन्ह्यात पाच आरोपींना पाच दिवसाची पोलीस कोठडी सुनावली. याप्रकरणी पुढील तपास पोलीस निरीक्षक मोहन भोसले हे करीत आहेत.