गर्दीचा फायदा घेवुन बसस्टॅन्ड व मार्वेâटमधून मोबाईल चोरी, ३५ मोबाईल जप्त
वर्धा (Mobile phone stealing) : गर्दीचा फायदा घेत बसस्थानक तसेच मार्वेâटमधून मोबाईल चोरी करणार्या झारखंड येथील आरोपीस पोलिसांनी अटक केली. पोलिसांनी ३५ मोबाईलसह ३ लाख ४० हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
देवळी तालुक्याच्या आंजी येथील फिर्यादीचा मोबाईल बसमध्ये गहाळ झाल्याबाबत ऑनलाईन तक्रार केली होती. त्या गहाळ झालेल्या मोबाईलमध्ये आधार कार्ड, पॅन कार्ड तसेच पंजाब नॅशनल बँक शाखा अंदोरीचे पासबुकचे फोटो काढून ठेवले होते. त्यानंतर फिर्यादी यांनी त्याच नंबरचे सीम घेवुन दुसरे माबाईलमध्ये टाकले. काही वेळाने मोबाईलवर १०,००० व त्यानंतर लगेच ५००० रुपये खात्यातून डेबीट झाल्याचा मॅसेज आला. त्यानंतर पंजाब नॅशनल बँकेच्या कस्टमर केअर नंबरवर कॉल लावून माहिती दिली. परंतु बँकेला सतत सुट्या असल्याने बँकेत न जाता सायबर ऑफीस वर्धा येथे गेले.
त्यावेळी त्यांनी क्रमांकाचे सिम असलेल्या मोबाईलमध्ये फोन पे अॅप उघडून पाहिले असता पंजाब नॅशनल बँकेच्या खात्यातून १ लाख १६ हजार ५०० रुपये डेबीट झाल्याचे सांगितले. याप्रकरणी तक्रारीवरून देवळी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्ह्याचा समांतर सायबर सेलमार्फत करण्यात आला. तपासदरम्यान तांत्रीक बाबी तसेच गोपनीय माहितीच्या आधारे मोबाईल चोरांची टोळी ही झारखंड राज्यातील महाराजपुर बाजार येथील असल्याची माहिती पुढे आली.
त्यामध्ये आरोपी आर्यन नोनीया रा. सी.पी. धारवा ऑफीस पारा, बारधेगो, बर्धमान, वेस्ट बंगाल हा निष्पन्न झाला. माहिती घेतली असता तो रेल्वेमध्ये झारखंड येथे जात असल्याचे समजल्याने रेल्वे पोलिसांच्या मदतीने झारसुगुडा, ओरीसा येथे ताब्यात घेतले. पोलिसांचा पुढील तपास सुरू आहे.