नांदेड(Nanded) :- जबरी चोरी प्रकरणातील आरोपीस स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने 3 जुलै रोजी अटक केली असून त्याच्याकडून 44 हजार 895 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला.
एकूण 44 हजार 895 रुपयाचा ऐवज जप्त
स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकास 3 जुलै रोजी रेणुकाई हॉस्पीटलजवळ (Hospital)जबरी चोरी करणाऱ्या आरोपीपैकी एक आरोपी गोवर्धनघाट येथे असल्याची माहिती मिळाली. या माहितीवरून आहे अशी माहीती मिळाल्याने त्यांनी तशी माहीती वरीष्ठांना देवुन स्थागुशाच्या पथकाने गोवर्धनघाट येथे सापळा रचुन आरोपी शेख माजीद शेख उस्मान (20) रा. गोवर्धनघाट यास ताब्यात घेवुन विचारपुस केली असता त्याने व त्याचा इतर एक साथीदारानेयांनी मिळुन 7 जून रोजी रेणुकाई हॉस्पीटल जवळ येथुन एका महीलेच्या गळयातुन जबरीने गंठन चोरी केल्याचे सांगीतले. नमुद आरोपीचे ताब्यातुन गंठनचा त्याचे हिश्याचा तुकडा व मंगळसुत्र (Mangalsutra) असा एकूण 44 हजार 895 रुपयाचा ऐवज जप्त केला.
इतर एका साथीदाराचा शोध घेणे सुरु
त्याच्या इतर एका साथीदाराचा शोध घेणे सुरु आहे. मिळुन आलेल्या आरोपीस मुद्देमालासह पुढील तपासकामी शिवाजीनगर पोलीसांच्या ताब्यात दिले आहे.या कारवाई पथकात पोलिस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे, अप्पर पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली स्थागुशाचे पोनि उदय खंडेराय, पोउपनि मिलींद सोनकांबळे, पोकों बालाजी यादगीरवाड, विठ्ठल शेळके, ज्वालासिंघ बावरी, गजानन बयनवाड, विलास कदम, चालक हनुमानसिंह ठाकुर यांचा समावेश होता.