कारंजा (Karanja Robbing) : फ्लिपकार्ट या ई – कॉमर्स कंपनीच्या वेबसाईटवरून मोबाईल बूक केल्यानंतर त्याची पोच देताना आरोपीने डिलेव्हरी बॉयला चाकूचा धाक दाखवून ४८ हजार ४०० रुपयाने लुटण्यात आल्याची घटना २६ मे रोजी स्थानिक एस. के. हॉल जवळ घडली होती. या (Karanja Robbing) प्रकरणी शहर पोलिसांनी २८ मे आरोपीस अटक केली असून, न्यायालयाने त्याला ३० मे पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.
याप्रकरणी नितेश सुभाष तितीरमारे (३१, रा. निलज खु.पो. नवेगाव ता. मोहाडी जि. भंडारा ह. मु. शिवाजी नगर कारंजा ) यांनी फिर्याद नोंदवली होती.
त्यानुसार ते शाडोफॉक्स कंपनीत हब इन्चार्ज असून, स्थानिक एस. के. हॉल जवळ कंपनीचे ऑफिस आहे. आरोपी हसीब खान आसिफ खान (३५, रा. फारुक कॉलनी कारंजा) याने त्याच्या पत्नीच्या नावाने सॅमसंग गॅलक्सी एस २५ अल्ट्रा कंपनीचा मोबाईल ( किंमत १ लाख २९ हजार रुपये) ऑनलाईन ऑर्डर करून त्यापोटी ८१ हजार ५९९ रुपये हे फ्लिपकार्ड कंपनीला देय केले होते.
या मोबाइलची डिलेव्हरी देत असताना मात्र आरोपीने उर्वरित पैसे भरण्यास नकार देऊन फिर्यादीसोबत धोकाधडी करत त्याला चाकूच्या धाकावर लुटले होते. त्यावरून पोलिसांनी आरोपीविरुद्ध फसवणुकीचा (Karanja Robbing) गुन्हा दाखल केला होता. त्याला पोलिसांनी अटक केली असून, ३० मे पर्यंत पोलिस कोठडी मिळवली आहे.




