Gadchiroli :- प्रतिबंधित तंबाखुची तस्करी करणार्या आरोपीस गडचिरोली येथील स्थानीक गुन्हे शाखेने (Local Crime Branch) अटक करून त्याच्याकडून ८ लाख २२ हजार ७५० रूपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. ललीत राठीr रा. अर्जुनी मोरगाव असे आरोपीचे नांव आहे.ही कारवाई काल ९ ऑक्टोबर रोजी देसाईगंज येथील कन्नमवार वार्डाकडे जाणार्या रस्त्यावर करण्यात आली.
०८ लाख २२ हजार ७५० रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त
सुगंधित तंबाखुची तस्करी होणार असल्याची माहिती मिळताच गडचिरोली येथील स्थानीक गुन्हे शाखेने देसाईगंज येथील कन्नमवार वार्डाकडे जाणार्या रस्त्यावर सापळा रचला.एक संशयीत ग्रे रंगाची मारोती कंपनीची इको चारचाकी वाहन राज प्रोव्हिजन्स किराणा दुकानासमोर थांबवून काहीतरी सामान वाहनाच्या आतुन उतरवित असताना दिसून आले. यावरुन पोलीस पथकाने पंचासमक्ष सदर ठिकाणी धाड टाकली असता, एक अज्ञात इसम पोलीसांना पाहून हातातील चुंगळी वाहनाजवळ सोडून पळून गेला. मात्र वाहन चालक ललीत गोपालदास राठी (४१) हा पंच व पोलीसांना सदर चारचाकी वाहनाच्या ड्रायव्हर (driver) सिटवर बसलेला मिळून आला. यानंतर पोलीसांनी १,३०,९०० रुपये किमतीचा सुगंधित तंबाखु (tobacco) तसेच ३ लाख रूपये किमतीची एम एच ३५ ए डब्लू ३३९५ क्रमांकाची कार, आरोपी ललीत गोपालदास राठी याचे ताब्यात असलेली २,१९,६०० रुपये रोख रक्कम असा एकूण ८,२२,७५० रुपये किंमतीचा मुद्देमाल गडचिरोली पोलीसांनी जप्त केला आहे.
आरोपी नामे ललीत राठी याची सखोल चौकशी केली असता त्याने घटनास्थळावरून पळून जाणारा आरोपी हा राज प्रोव्हिजन्स किरणा दुकाणाचा मालक इंद्रकुमार नागदेवे, रा. देसाईगंज असल्याचे त्याने सांगितले .अवैध मुद्देमाल हा रवी मोहनलाल खटवानी, रा. गोंदिया याच्या मालकीचा असून त्याने विक्री करण्यासाठी सदर मुद्देमाल आपल्याकडे सोपविल्याचे आरोपी ललीत राठी याने सांगितले.