एलसीबीने लावला गुन्हाचा छडा
वणी (Wani murder case) : वणी-घुग्घुस रोडवरील एका बार समोर मंदर शिवारात एका इसमाचा १८ ऑगस्ट रोजी सकाळी नग्नावस्थेत मृतदेह आढळला होता. खून असल्याच्या प्राथमिक अंदाजावरून मृतक देवराव गुंजेकर (५५) याच्या भाचीने याबाबत तक्रार दिली होती. अखेर या प्रकणाचा छडा लागला असून आरोपी आशिष संजय कटोते (२५) रा. वागदरा याने हा (Wani murder case) खून केल्याचे समोर आले आहे. मंगळवारी संध्याकाळी आरोपीच्या मुसक्या आवळण्यात आल्या.
मृत देवराव हे रजानगर लालगुडा (नवीन) येथील रहिवासी होते. ते तिथे त्यांच्या भाचीसह राहत होते. देवरावला दारु पिण्याची सवय होती. त्यामुळे तो अनेकदा एक दोन दिवस घरून बेपत्ता राहत होते. त्यामुळे त्याच्या भाचीने याबाबत पोलीस ठाण्यात तक्रार दिली नव्हती. मात्र तिस-या दिवशी घुग्घुस रोडवर त्यांचा मृतदेह आढळून आला होता. लालगुडा चौक वणी येथे सापळा रचुन आशिष संजय कटोते (२१) रा. नविन वाघदरा यास गाठले, त्याला पोलिसी हिसका दाखवताच त्यास विचारपुस केली असता त्याने सांगीतले की, (Wani murder case) घटनेच्या चार दिवस अगोदर तो रात्री दारु पिवुन लालगुडा चौक येथे झोपुन असतांना त्याचे खिशातील १० हजार रुपये व मोबाईल कोणीतरी काढुन घेतला होता, त्यानंतर त्याला माहिती पडले की, त्याचे खिशातील पैसे व मोबाईल मृतक देवराव याने काढुण घेतला होता त्यावरुन त्याने घटनेचे दिवशी मृतक देवराव गुंजेकर याचा शोध घेवुन त्यास लालगुडा चौक येथुन रात्रीदरम्याण मोटर सायकलवर बसवुन दारु पिण्याचे बाहाण्याने घटनास्थळी नेवुन त्यास मोबाईल फोन व पैशा बाबत विचारपुस केली.
परंतु देवराव गुंजेकर यांनी त्यास काही एक सांगीतले नसल्याने आरोपी आशिष संजय कटोते याने रागाच्या भरात मृतक यास लाथा बुक्याने मारहाण करुन व दगडाने मारुन त्याचा खुन केला असल्याची कबुली दिली. ही (Wani murder case) कारवाई एलसीबी प्रमुख सतीश चवरे यांच्या मार्गदर्शनात फौजदार गजानन राजमुल्लु, फौजदार धनराज हाके,एपीआय दत्ता पेंडकर,सैयद साजीद, सुनिल खंडागळे, रुपेश पाली, सुधिर पांडे, निलेश निमकर, सुधिर पिदुरकर, रजनिकांत मडावी, सलमान शेख, सुनिल पैठणे, आकाश सुर्यवंशी, नरेश राउत, सतिष फुके, पठाण तसेच फौजदार धिरज गुन्हाणे व डिबी पथक पो.स्टे. वणी आदींनी यशस्वीरित्या पार पाडली आहे.