मालमत्ता नोंदणीचे दस्तावेज जळाले
देशोन्नती वृत्तसंकलन
परतवाडा () : अचलपूर नगरपरिषदेच्या कार्यालय परिसरात असलेल्या मुख्य इमारतीच्या मागील (Tax department) कर विभागाच्या इमारतीच्या वरच्च्त्या भागाला १५ सप्टेंबर रोजी दुपारी पडताच ४ वाजताच्या सुमारास अचानक आग लागली. ही आग देताच आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न सुरू केल्यानंतर तत्काळ जवळपास एक तासानंतर या आगीवर नियंत्रण मिळविण्यास यश आले.
अचलपूर नगरपालिका परिसरात रविवारची सुटी अधिकारी व कर्मचारी हजर नव्हते. (Tax department) कर विभागाच्या असलेल्या स्वच्छतागृहात एक इसम लघुशंकेला आला असता या (Achalpur municipal council) इमारतीतून धूर निघत असल्याची त्यांच्या नजरेस त्याने तत्काळ अग्निशमन विभागासही माहिती अग्निशमन विभागाचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी येऊन आग विझवायला सुरुवात केली. यावेळी न. प. बांधकाम अभियंता अरविंद गोठवाल, अग्निशमन अधिकारी संदेश जोगदंड, करविभागाचे अधिकारी व कर्मचारी तत्काळ घटनास्थळी दाखल झाले.
या आगीत मालमत्ता नोंदणी संदर्भातील महत्त्वपूर्ण दस्तावेज व फाईल कार्यालयात ठेवलेले संगणक आगीमध्ये जळाले. ही आग कशामुळे लागली, याचे कारण अद्याप निश्चित झाले नसले तरी विद्युत घर्षणाने ही आग लागली असावी, असा अंदाज लावल्या जात आहे. या घटनेने १९९२ साली (Achalpur municipal council) अचलपूर शहरातील पालिकेला लागलेल्या घटनेची चर्चा या निमित्ताने होत होती.