मानोरा (Washim):- स्थानिक मा. सु. पा. महाविद्यालय मानोरा येथे आज दिनांक २० सप्टेंबरला ठीक दुपारी १२.३० वाजता दूरदृश्य प्रणालीद्वारे कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभागाद्वारे निर्मित आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्राचे उद्घाटन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी (Narendra Modi)यांच्या शुभहस्ते केले जाणार आहे.
कार्यक्रमाला मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, केंद्रीय मंत्र्यांची उपस्थिती
या उद्घाटन समारंभाला प्रमुख उपस्थिती म्हणून महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल डॉ.सी.पी राधाकृष्णन, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे(Eknath Shinde), केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari)उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis),अजित पवार उपस्थित राहणारआहेत. आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्राची संकल्पना मंत्री मंगलप्रभात लोढा यांची असून या उद्घाटन समारंभाला मा. सु. पा महाविद्यालयात ज्ञानोपासक शिक्षण प्रसारक संस्था मानोराचे अध्यक्ष अरविंद पाटील इंगोले, संस्थेचे सचिव महादेवराव ठाकरे तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नंदकिशोर ठाकरे व्यक्तिशः उपस्थित राहणार आहेत. महाविद्यालयात या केंद्राचे संयोजक प्रा. प्रशांत कांबळे आहेत.
या योजने अंतर्गत महाविद्यालयामध्ये डायबेटस, एज्यूकेटर, रिटेल , फार्मसी मॅनेजमेंट, फ्रंट ऑफिस असिस्टंट, होम हेल्थ एड आणि मोबाईल फोन हार्ड वेअर रिपेअर टेक्निशियन अल्प मुदतीचे प्रमाणपत्र अभ्यासक्रम विनामूल्य शिकविल्या जाणार आहे. तरी परिसरातील नागरिकांनी या कार्यक्रमात सहभागी होण्याचे आवाहन संस्थेचे अध्यक्ष अरविंद पाटील इंगोले यांनी केले आहे.