वर्धा (Wardha) :- अवैधरित्या वाळू वाहतूक करणार्यांवर कारवाई करत पोलिसांनी २ ट्रक टिप्पर, २ ट्रॅक्टर चालकांच्या ताब्यातून वाळूसह ३५ लाख ३९ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. स्थानिक गुन्हे शाखेच्या (Local Crime Branch) पथकाने ही कारवाई केली.
२ ट्रक टिप्पर, २ ट्रॅक्टर चालकांच्या ताब्यातून वाळूसह ३५ लाख ३९ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त
स्थानिक गुन्हे शाखेचे पथक पेट्रोलींग (Patrolling) करताना दारोडा, शेकापुर बाई, डोरला या वाळू घाटामधुन वाळूची अवैध वाहतूक होत असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी छोटी वणी, हिंगणघाट येथे नागपूर हैद्राबाद महामार्गावर नाकेबंदी केली. यावेळी वाहतुक करणारे २ ट्रक टिप्पर चालक लुकमान शेख गफ्फार शेख, रा. सालोड (हि). पडेगांव रोड, जि. वर्धा, विनोद धनु राठोड, रा. आर्णी रोड, वडगाव जि. यवतमाळ यांच्या ताब्यातून एम.एच. ३१ सी.बी. ७७५९ आणि एम.एच. २९ ए.एन. ४४६६ क्रमांकाचे टिप्पर तसेच वाळू, २५० फुट ओली रेती, डोरला वाळू घाटमधुन वाळूची अवैधरीत्या वाहतूक करणारे ट्रॅक्टर चालक रोशन संजय सराटे, अमोल शंकर मोहिजे रा. धोची, हिंगणघाट, जिल्हा वर्धा, मालक कृष्णा नरूले रा. धोची वडणेर, वर्धा यांना ताब्यात घेऊन एम. एच. ३२ ए.एच. ५२३०, ट्रॉली, एक महींद्रा कंपनीचा एम.एच. ३२ ए.एच. ९५१९ व ट्रॉली आणि वाळू असा ३५ लाख ३९ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी वडनेर पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले.
ही कारवाई पोलिस अधीक्षक अनुराग जैन, अपर पोलीस अधीक्षक डॉ. सागर कवडे यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक विनोद चौधरी, उमाकांत राठोड, गजानन लामसे, रितेश शर्मा, गोपाल बावणकर, मंगेश आदे, दिपक साठे यांनी केली.