परभणी (Parbhani):- पशुपक्षी व मानवी जिवीतास हानीकारक असलेल्या नायलॉन (Nylon)मांजा विक्रेत्यांवर पोलीसांनी कारवाई केली आहे. नानलपेठ आणि गंगाखेड पोलीस ठाणे हद्दीत कारवाया करत संबंधितावर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
गंगाखेड पोलीस ठाणे हद्दीत कारवाया करत संबंधितावर गुन्हे दाखल
परभणी शहरातील नानलपेठ पोलीस ठाणे हद्दीत जिजामाता रोड भागात ९ जानेवारी रोजी कारवाई करण्यात आली. पोनि. चितांबर कामठेवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अंमलदार निलेश कांबळे यांनी कारवाई केली. या ठिकाणी असलेल्या एका दुकानातून १ हजार २०० रुपये किंमतीचा नायलॉन मांजा जप्त करण्यात आला. अजमतउल्ला तांबोळी याच्यावर गुन्हा नोेंदविण्यात आला आहे. तपास पोना. रासवे करत आहेत. गंगाखेड पोलीस ठाणे हद्दीत जयतीपुरा या भागात पोलीसांनी कारवाई करत १२०० रुपये किंमतीचा नायलॉन मांजा जप्त केला. पोलीस अंमलदार परसराम परचेवाड यांच्या फिर्यादीवरून रियाजोद्दीन शेख याच्यावर गंगाखेड पोलीसात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. तपास पोह. रेंगे करत आहेत.