मानोरा(Washim):- आसेगाव पोलीस स्टेशन अंतर्गत मौजे गोस्ता येथील गैरअर्जदार तीन जण दि. २८ नोव्हेंबर रोजी रात्रीच्या सुमारास हातात तलवारी, चाकू, सुरा घेऊन घरी आले. व माझे पती रुपेश नानुसिंग राठोड यांना घरून जबरदस्तीने घेऊन गेले. माझा पती बेपत्ता असुन याबाबत दुसऱ्या दिवशी सकाळी आसेगाव पोलीस स्टेशनला (police station)कैफियत देण्यासाठी गेली असता कैफियत न घेता ठाण्यात उपस्थित पोलीसांनी मला, कैफियत न घेता हाकलून दिले. त्यामुळे मला न्याय द्यावा, अशी मागणीचे लेखी तक्रार निवेदन दि. २९ सप्टेंबर रोजी जिल्हा पोलिस अधीक्षक यांना गोस्ता येथील पिडीत महिला उषाबाई रुपेश राठोड यांनी दिले आहे.
गैरअर्जदाराच्या तावडीतून पतीची सुटका करण्याची मागणी
तक्रार निवेदनात नमूद केले आहे की, रात्रीच्या सुमारास गावातील गैरअर्जदार मनोहर शिवचद पवार, गोवर्धन शिवचद पवार व नवल राठोड हे तिघे जण हातात तलवारी, चाकू, सुरा घेऊन माझ्या घरी आले. तिघांनी माझे पती रुपेश राठोड याला जबरदस्तीने हात धरून घेऊन गेले. त्यावेळी मी जोरजोराने ओरडून अडविले असता गैर अर्जदारांनी माझे तोंड दाबून धक्काबुक्की केली. व तुझ्या घरातील सर्व लोकांना धरणात धरणात फेकून देतो, असे सांगून जीवाने मारण्याची धमकी देत माझ्या पतीला सोबत घेऊन गेले. त्यावेळी मी घाबरून जात बेशुद्ध पडली. त्यानंतर गावातील दोघांनी येऊन मला, सावध केले. त्यांना घडलेली सर्व हकीकत सांगितली.
आरोपींची पाठराखण करणाऱ्या पोलिसांची चौकशी करावी
माझा पती भाग्यश्री ऊस कारखाना (sugarcane factory) परतून जिल्हा जालना येथे ऊस तोडणीसाठी मजुर घेऊन जाणार होता. मजुरांना देण्यासाठी ३ लक्ष रूपये त्यांच्याजवळ होते. या रक्कमेसह माझ्या पतीला सुध्दा गैरअर्जदार घेऊन गेले आहे. दुसऱ्या दिवशी सकाळीच आठ वाजता ठाण्यात घडलेल्या घटनेची कैफियत देण्यासाठी गेली असता माझे म्हणणे ऐकून न घेता, मला ठाण्यातून हाकलून दिले. त्यामुळे मला, न्याय द्यावा व सदर घटनेची आपल्या स्तरावरून चौकशी करून दोषिवर कारवाई (action) करण्याची मागणीचे तक्रार निवेदन पोलीस अधीक्षक यांना पिडीत महीलेले दिले आहे.