हिंगोली (Hingoli hospital) : जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. नितीन तडस हे प्रत्येक दिवशी रूग्णालयातील विविध विभागाची पाहणी करीत असतात त्यांच्यासोबत तंबाखू विरोधी पथकही असते. सप्टेंबर महिन्यात ५९ तंबाखू बहाद्दरांकडून ८ हजार रूपयाचा दंड वसूल करण्यात आला आहे.
शासकीय कार्यालयासह इतर सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान, तंबाखू आदींवर निर्बंध घालण्यात आलेले आहेत. ज्यांनी-ज्यांनी त्याचे उल्लंघन केले. त्यांच्यावर तंबाखू विरोधी (कोटप्पा) कायद्याच्या कलम ४ नुसार सार्वजनिक ठिकाणी तंबाखूयुक्त पदार्थ खाणे, थुंकणे व बाळगण्यास सक्त मनाई केली आहे. (Hingoli hospital) जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. नितीन तडस यांच्या मार्गदर्शनाखाली सप्टेंबर महिन्यात ५९ लोकांकडून ८ हजार रूपयाचा दंड वसूल करण्यात आला आहे. यावेळी डॉ.बालाजी भाकरे, दंतरोग तज्ञ नोडल वैद्यकीय अधिकारी डॉ. फैसल सलीम खान, श्रीमती आशा क्षीरसागर, कुलदीप केळकर, आनंद साळवे, अनिस प्यारेवाले आदी कर्मचारी उपस्थित होते.
जिल्हा शासकीय रूग्णालयात (Hingoli hospital) येणार्या रूग्णासह नातेवाईकांनी तंबाखूयुक्त पदार्थ गुटखा, बीडी, सिगारेट आदींचे सेवन न करता रूग्णालयीन परीसर स्वच्छ ठेवण्यास सहकार्य करावे.
– डॉ. फैसल सलीम खान, दंतरोग तज्ञ नोडल वैद्यकीय अधिकारी, जिल्हा रूग्णालय हिंगोली