परभणी/गंगाखेड (Social media) : सोशल मिडियावर चुकीच्या पोस्ट व कमेंट करून सामाजिक तेढ निर्माण करणाऱ्यांविरुद्ध कार्यवाही करण्याची मागणी दिनांक १० जून सोमवार रोजी नायब तहसीलदार अशोक केंद्रे व उपविभागीय (Parbhani Police) पोलीस अधिकारी डॉ. दिलीप टिपरसे यांना दिलेल्या निवेदनात करण्यात आली आहे.
परभणीच्या गंगाखेड शहरातील घटना
माजी मंत्री लोकनेत्या पंकजाताई मुंडे, कृषी मंत्री धनंजय मुंडे व वाल्मीक अण्णा कराड यांच्याबद्दल सोशल मिडियावर वादग्रस्त पोस्ट टाकून समाजा समाजात तेढ निर्माण करणाऱ्याविरुद्ध कार्यवाही करून संबंधित तरुणांना अटक करण्याच्या मागणीसाठी दि. १० सोमवार रोजी नायब तसलीदार व (Parbhani Police) उपविभागीय पोलीस अधिकारी यांना निवेदन देण्यात आले. यावेळी माजी नगराध्यक्ष रामप्रभु मुंडे, माजी जिल्हा परिषद सदस्य लक्ष्मण मुंडे, संदीप केंद्रे, बालाजी मुंडे, यश घुले, जगन्नाथ आंधळे, ओमकेश लटपटे, नवनाथ पाळवदे, अक्षय आंधळे, गणेश खोकले, गोविंद केंद्रे, विशाल मुंडे, महादेव फड, व्यंकटेश भेंडेकर आदींसह सकल ओबीसी समाज बांधव व सकल वंजारी समाज बांधवांसह स्व. गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानचे पदाधिकारी उपस्थित होते.