पातुर (Static Survey Team) : महाराष्ट्रातील विधानसभेच्या निवडणुकीसाठी निर्माण केलेल्या पातुर तहसील स्थिर पथकाने (Static Survey Team) स्थिर सर्वेक्षण पथकाने मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत पातुर मालेगाव रोडवरील चेक पोस्टवर एक वाहनात 2लाख 49 हजार 600 रुपये जप्त करण्यात आले आहेत. पातुर तहसीलमध्ये स्थिर सर्वेक्षण पथकाची स्थापना अकोला जिल्हाधिकारी अजित कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली केली गेली आहे. उपविभागीय अधिकारी अनिरुद्ध बक्षी आणि तहसीलदार डॉ. राहुल वानखडे यांच्या देखरेखीत काम करत असलेल्या या पथकाचे नोडल ऑफिसर म्हणून नायब तहसीलदार बळीराम चव्हाण यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
23 ऑक्टोबर 2024 रोजीआज सकाळी 11:50 वाजता पातुर मालेगाव रोडवर गाड्यांची तपासणी (Static Survey Team) करत असताना वाहन क्रमांक एम एच 37 टी 18 02 मध्ये खाते तपशील नसलेली रक्कम सापडली. यामुळे निवडणुकीसाठी नियमांचे उल्लंघन होण्याची शक्यता निर्माण झाली होती. सदर रक्कम जप्त करून ती उपकोशागार कार्यालयामध्ये जमा करण्यात आली असून याबाबत पुढील चौकशी केली जाणार आहे. या कारवाईमुळे बाळापुर मतदार संघात वचक निर्माण झाला आहे. स्थिर संरक्षण पथकाने कडक तपासणी सुरू ठेवली आहे, ज्यामुळे अनाठ रक्कम घेऊन जाणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.
सदर तपासणीमध्ये ग्रामसेवक, पोलीस कर्मचारी यांचा समावेश होता, आणि त्यांनीही या कार्यात सक्रियपणे सहभाग घेतला. 22 ऑक्टोबर 2024 रोजी रात्री 10 वाजता देखील याच मार्गावर तपासणी करण्यात आली होती. अकोला जिल्ह्यातील प्रशासनाने यापुढेही अशा प्रकारच्या कारवायांमध्ये कडक लक्ष ठेवण्याचे सूचवले आहे, ज्यामुळे निवडणुकांच्या पारदर्शकतेची खात्री केली जाईल.