Akola:- पातुर सावरखेड चेक पोस्टवर तहसीलदार स्थिर पथकाने पुन्हा एकदा महत्त्वाची कारवाई केली आहे. 23 ऑक्टोबर 2024 रोजी, स्थिर पथकाने चेक पोस्टवर (Check post) तपासणी करताना 70,000 रुपयांची रोख रक्कम जप्त केली. ही कारवाई रात्री 9:30 वाजता झाली, जेव्हा वाहन क्रमांक MH 30 BL 4065 ही सोनेट कार थांबवण्यात आली. बाळापुर मतदारसंघाच्या निवडणुकांदरम्यान स्थिर पथकाची स्थापना झाल्यानंतर, पातूरच्या स्थिर पथकाने तपासणी मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेत पातुरचे नोडल ऑफिसर बळीराम चव्हाण यांच्या नेतृत्वाखालील पथकाने आधीच 2, 49, 600 रुपयांची रोख रक्कम जप्त केली होती.
नोडल ऑफिसरच्या नेतृत्वाखालील पथकाने केली 2, 49, 600 रुपयांची रोख रक्कम जप्त
या कारवाईसाठी उपस्थित असलेल्या पथकात एन. एम. साळुंखे (पथक प्रमुख), एस. बी. घोडके, ए आर गाडगे, नंदनकर पोलीस कॉन्स्टेबल आणि इतर कर्मचारी सामील होते. हे स्थिर पथक अकोला जिल्हाधिकारी अजित कुंभार, बाळापूरचे उपविभागीय अधिकारी अनिरुद्ध बक्षी आणि पातुर तहसीलदार डॉ. राहुल वानखडे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत आहे. या कार्यामुळे पातुर तालुक्यात व बाळापूर मतदारसंघात (constituencies) एक वचक निर्माण झाला आहे, आणि या प्रकरणाची चौकशी सुरू असल्याची माहिती महसूल क्षेत्राकडून मिळाली आहे. स्थिर पथकाच्या कार्यामुळे निवडणुकांच्या काळात पारदर्शकता आणि कायद्याचे पालन सुनिश्चित करण्याच्या दिशेने एक महत्त्वाच पाऊल उचलल गेला आहे.