मानोरा (Illegal logging case) : तालुक्यातील गादेगाव येथे अवैध वृक्षतोड केलेली लाकडे ट्रॅक मध्ये मशीनच्या साहाय्याने भरत असल्याची गुप्त माहिती ६ आक्टोबर ला मिळाली. वन परीक्षेत्र अधिकारी जनमेश जाधव यांना मिळाली त्यानी ट्रकमध्ये भरलेली लाकडे व मशीन ताब्यात घेऊन शेंदुरजना डेपोत लावून. त्यानी प्रकरणाची चौकशी सुरु केली आहे.
प्राप्त माहिती नुसार मानोरा तालुक्यातील गादेगाव येथे एका ठेकेदाराने गावातील काही शेतकऱ्याच्या धुर्यावरील आडजात हिरवे झाड विकत घेऊन त्या झाडाची कटाई करून मजुरा मार्फत गावातील स्मशान भूमी जवळ लागडे जमा करून सदर ठेकेदार यांने ट्रक आणून ६ आक्टोबर ला लाकडे भरत असल्याची गुप्त माहिती मानोरा वन परीक्षेत्र अधिकारी जनमेश जाधव यांना मिळताच घटना स्थळी येऊन त्यानी वाहणाचा पंचनामा करून वाहन व वाहणात ज्या मशीनने लागडे टाकत होता ती मशीन ताब्यात घेऊन शेंदुरजना डेपो येथे लावून सदर प्रकरणाची चौकशी सुरु आहे.
एखादे धोक्याचे झाड असेल तर अशा झाडाची कटाईची परवानगी वन विभाग मार्फत दिली जाते. जून पासून अवैध वृक्ष कटाई करणार्यांना प्रति झाड पन्नास हजार रुपये प्रमाणे दंड आकारले जाणार आहे. गादेगाव येथील कोणत्या शेतकऱ्यांच्या शेतातील लाकडे तोडली व एकूण किती तोडली याची पूर्ण माहिती घेतल्यावर वन कायदा नुसार दंड व कारवाई केली जाईल.
– जनमेश जाधव, वन परीक्षेत्र अधिकारी, मानोरा


