सहाय्यक पोलीस अधीक्षक राहुल चव्हाण यांची सोनेगाव स्टेशन शिवारात कारवाई
वर्धा (Sand Thieves Case) : पोलिसांनी मिळालेल्या माहितीवरून नाकाबंदी करून ट्रक, वाळूसाठ्यासह ५५ लाख ७० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला. पुलगाव येथील सहायक पोलिस अधीक्षक राहुल चव्हाण यांनी पोलिस अधिकारी, कर्मचार्यांसह सोनेगाव स्टेशन शिवारात ही (Sand Thieves Case) कारवाई केली.
धोत्रा मार्गाने वर्ध्याकडे ट्रकमध्ये वाळूची चोरटी वाहतुकीसंदर्भात पोलिस अधिकार्यांना गोपनिय माहिती मिळाली. त्या अनुषंंगाने सोनेगाव (स्टेशन) परिसरात नाकाबंदी करण्यात आली. त्यावेळी धोत्राकडून येणारे ट्रक थाबंवून विचारपूस केली असता वाहनामध्ये वाळू असल्याचे सांगितले. पाहणी केली असता तिन्ही ट्रकमध्ये वाळू आढळून आली.
मात्र रॉयल्टी नसल्याचे सांगण्यात आले. त्यावरून पोलिसांनी रॉयल्टी नसल्याचे सांगीतले. (Sand Thieves Case) पोलिसांनी वाळू, ट्रकसह ५५ लाख ७० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी संतोष भिक्कु आहके, रा. तळेगांव (टालाटुले), प्रशांत कामडी, रा. तळेगांव (टालाटुले), विशाल लक्ष्मणराव ससाणे, रा. सावंगी मेघे, प्रणित सुधाकर देवडे, रा. बोथुडा ता. समुद्रपूर, विलास मारोतराव मन्ने, रा. हिरापुर सालोड, गोलू जगताप रा. वर्धा या सहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
ही (Sand Thieves Case) कारवाई सहायक पोलिस अधीक्षक राहुल चव्हाण यांनी प्रत्यक्ष उपस्थित राहुन सहायक पोलिस निरीक्षक प्रफुल डाहुले, पोउपनि अशिवनकुमार खेडीकर, सुधिर बनकर, रामदास दराडे, संदीप बोरबन यांनी केली. पोलिसांचा पुढील तपास सुरू आहे.




