ईसोली(Buldana):- स्थानिक तंटामुक्ती अध्यक्षांसाह भाजपच्या (BJP)अनेक कार्यकर्त्यांनी ८ सप्टेंबर रोजी चिखली येथे संपर्कप्रमुख प्रा. नरेंद्र खेडेकर यांच्या हस्ते शिवसेना (Shivsena) उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश घेतला. या पक्षप्रवेशामुळे ईसोलीत भाजपला फटका बसला असून आगामी काळातील राजकीय समिकरणे बदलणार असल्याचे बोलले जात आहे.
पक्षप्रवेशामुळे भाजपला फटका बसल्याची चर्चा
ईसोली हे चिखली तालुक्यातील राजकीयदृष्टीने महत्वाचे गाव मानले जाते. त्यामुळे सर्वच पक्षांच्या नेते, पुढाऱ्यांचे या गावाकडे व गावातील पक्षीय राजकारणाकडे लक्ष असते. या पार्श्वभूमीवर आज भाजपच्या अनेक कार्यकर्त्यांनी उबाठात प्रवेश घेतल्याने भाजपला फटका बसल्याचे बोलले जात आहे. संपर्कप्रमुख प्रा. नरेंद्र खेडेकर, जिल्हाप्रमुख जालिंदर बुधवत, युवा नेते संदीप शेळके यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून तंटामुक्ती अध्यक्ष गजानन येवले, सीताराम येवले, प्रवीण गवई, सतीश मोरे, भगवान शिंदे, दादाराव पवार, दत्ता लागे, दीपक सावंत, संदीप वाडेकर, किसन पानसबळ, सचिन गिरगुणे, अमोल झरेकर, गोविंद येवले यांच्यासह कार्यकर्त्यांनी चिखली येथे उबाठात प्रवेश घेतला.यावेळी उपजिल्हाप्रमुख कपिल खेडेकर, उपतालुकाप्रमुख सुभाष पाटोळे, खरेदी विक्री संघ संचालक दामू अण्णा येवले, बाजार समिती संचालक संतोष वाकडे, माजी तालुकाप्रमुख विश्वास खंडागळे, अण्णा देवकर, बंडू सरसे, सुनील शुक्ला, भीमा गिरगुणे, विठ्ठल जाधव, शाहिद भाई, दामोदर शेळके यांची उपस्थिती होती.