“वाचन संकल्प महाराष्ट्राचा” अंतर्गत गर्दे वाचनालयाचा उपक्रम
बुलडाणा (Vachan Sankalp) : वाचन संकल्प महाराष्ट्राचा, हा महाराष्ट्र शासनाचा अभिनव उपक्रम १ ते १५ जानेवारी दरम्यान गर्दे वाचनालयात आयोजित करण्यात आला आहे. या (Vachan Sankalp) निमित्ताने साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त लेखक प्रा. डॉ. सदानंद देशमुख यांच्याशी साहित्य संवाद कार्यक्रमाचे आयोजन बुधवार १५ जानेवारी रोजी सायंकाळी ६ वाजता करण्यात आले आहे. त्यांच्याशी हा संवाद साधणार आहे ज्येष्ठ पत्रकार राजेंद्र काळे व रणजितसिंह राजपूत.
याच (Vachan Sankalp) कार्यक्रमात मराठी पत्रकार परिषदेचे नवनियुक्त प्रदेश उपाध्यक्ष चंद्रकांत बर्दे व जिल्हाध्यक्ष रणजितसिंग राजपूत यांचा सत्कार करण्यात येणार आहे. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी माजी नगराध्यक्ष तथा गर्देवाचनालयाचे अध्यक्ष गोकुळ शर्मा राहतील. जिल्हा ग्रंथालय अधिकारी सुनील पाटील यांची विशेष उपस्थिती राहणार आहे. ज्येष्ठ पत्रकार विश्वंभर वाघमारे, उपाध्यक्ष बाबा वरणगावकर व सचिव उदयदादा देशपांडे यांचे देखील प्रामुख्याने उपस्थिती राहणार आहे. या (Vachan Sankalp) कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन गर्द वाचनालयाच्या वतीने करण्यात आले आहे.