(Bihar):- अभिनेत्री अन्नपूर्णा उर्फ अमृता पांडेय (Actress Amrita Pandeya) हिचा शनिवारी संध्याकाळी भागलपूरच्या जोगसर पोलीस स्टेशन हद्दीतील आदमपूर जहाज घाट येथे असलेल्या दिव्यधर्म अपार्टमेंटच्या फ्लॅट क्रमांक 104 मध्ये संशयास्पद परिस्थितीत मृत्यू(suspicious death) झाला.
घटनेची माहिती मिळताच जोगसर पोलीस घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी या घटनेचा एफएसएलमार्फत(FSL) तपास केला आहे. घटनास्थळावरून गळ्यातील साडीचा फास, मोबाईल व इतर साहित्य जप्त करण्यात आले आहे. कुटुंबीयांच्या म्हणण्यानुसार, त्याने भोजपुरी आणि हिंदीसह अनेक चित्रपट आणि मालिका, वेब सीरिज (Web series) आणि जाहिरातींमध्येही काम केले होते.
कुटुंबीयांनी सांगितले की, अमृताचा विवाह 2022 मध्ये छत्तीसगडच्या बिलासपूर (Bilaspur) येथील चंद्रमणी झांगड याच्याशी झाला होता. तो मुंबईत ॲनिमेशन इंजिनीअर(Animation Engineer) आहे. त्यांना अजून मुले नाहीत. तिच्या बहिणीच्या म्हणण्यानुसार, अमृता तिच्या करिअरबद्दल खूप चिंतेत होती. ती खूप उदास होती. याच कारणामुळे तिच्यावर उपचारही सुरू होते. नुकताच अमृताच्या हॉरर वेब सिरीज (Horror web series) प्रतिशोधचा पहिला भाग रिलीज झाला आहे. याविषयी ती खूप उत्साहितही होती. या प्रकरणाची प्रत्येक टप्प्यावर चौकशी केली जाईल, असे पोलीस ठाण्याचे अधिकारी म्हणाले.
‘अन्नपूर्णा’ या नावाने प्रसिद्ध असलेली भोजपुरी अभिनेत्री अमृता पांडेच्या निधनाने सर्वांनाच धक्का बसला आहे. मृत्यूपूर्वी भोजपुरी अभिनेत्री अमृताने तिच्या व्हॉट्सॲप(Whatsapp) स्टेटसवर लिहिले होते – ‘त्याचे आयुष्य दोन बोटींवर आहे, आम्ही आमची बोट बुडवून त्यांचा मार्ग सोपा केला. हे स्टेटस अमृताने तिच्या मृत्यूपूर्वी अपडेट केले होते. बरेच दिवस काम न मिळाल्याने ती डिप्रेशनमध्ये(Depression) होती, असे कुटुंबीयांचे म्हणणे आहे. अमृताच्या प्रतिशोध या हॉरर वेब सिरीजचा पहिला भाग नुकताच प्रदर्शित झाला आहे. अभिनेत्री अमृताच्या मृत्यूचे गूढ अद्याप उलगडलेले नाही.