400 वर्षे जुन्या मंदिराला घेतले सात वचन
मुंबई (Aditi-Siddharth Married) : आदिती राव हैदरी आणि सिद्धार्थ लग्नबंधनात अडकले. या जोडप्याने वानपर्थी येथील 400 वर्षे जुन्या मंदिरात एका खाजगी समारंभात लग्न केले. या सुंदर जोडप्याच्या लग्नाचे फोटोही समोर आले आहेत, ज्यामध्ये हे कपल खूपच सुंदर दिसत आहे. या (Aditi-Siddharth Married) अत्यंत साध्या लग्नाचे फोटो चाहत्यांना खूप आवडले आहेत. (Aditi Rao Hydari) आदिती राव हैदरीने तिच्या इंस्टाग्राम हँडलवर लग्नाचे सुंदर फोटो शेअर केले आहेत. ज्यामध्ये तिने पती सिद्धार्थसाठी एक सुंदर संदेशही लिहिला आहे. साध्या साडीत अदिती खूपच सुंदर दिसत आहे.
अभिनेत्री अदिती राव हैदरी (Aditi Rao Hydari) हिने हे सरप्राईज देऊन तिच्या चाहत्यांना खूश केले आहे. तिने तिचा प्रियकर सिद्धार्थसोबत लग्न केले आहे. या (Aditi-Siddharth Married) जोडप्याच्या लग्नाचे फोटो बघितले तर हे लग्न अगदी साध्या पद्धतीने पार पडल्याचे स्पष्ट होते. मंदिरात पारंपारिक रितीरिवाजांनी लग्न पार पडले. फोटोंमध्ये आदिती आणि सिद्धार्थ (Siddharth) विधी करताना दिसत आहेत आणि दोघेही एकमेकांकडे खूप प्रेमाने पाहत आहेत.
View this post on Instagram
अदितीने तिच्या खास दिवसासाठी साधी सोनेरी रंगाची साडी नेसली होती. तिने नाकात अंगठी, कानातले, बांगड्या आणि चोकर नेकलेस घातले होते. सिद्धार्थने पांढरा कुर्ता आणि लुंगी घालून त्याचा लूक पूर्ण केला. (Aditi-Siddharth Married) समारंभानंतर त्यांनी एकमेकांना मिठी मारली. या दोघांचे हे पहिले लग्न नाही. आदितीचे पहिले लग्न सत्यदीप मिश्रासोबत झाले होते, परंतु त्यांचे नाते केवळ चार वर्षे टिकले. त्याचप्रमाणे (Siddharth) सिद्धार्थचे पहिले लग्नही घटस्फोटात संपले. आता त्यांना एकमेकांची खरी साथ मिळाली आहे. (Aditi Rao Hydari) अदिती राजघराण्यातील आहे, तिचा जन्म हैदराबादच्या राजघराण्यात झाला. या जोडप्याला चाहते आणि सेलिब्रिटींकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.