Nanded :- नांदेडच्या हिमायतनगर तालुक्यातील दुधड-वाळकेवाडी येथील आदिवासी आश्रम शाळेत(Adivasi Ashram School) शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिंनीना दूषित पाणी प्यायल्यामुळे उलटी, मळमळ, पोटदुखी, आजाराची लागण झाली.
दूषित पाणी प्यायल्यामुळे विद्यार्थिनींना त्रास
विद्यार्थिंनीना (Students)या आजारामुळे त्रास होऊ लागल्याने त्यांना उपचारासाठी हिमायतनगर येथील ग्रामीण रुग्णालयात(Rural hospitals) दाखल करण्यात आले. हा प्रकार मागील तीन ते चार दिवसांपासून या शाळेत सुरू असून संबंधित शाळा प्रशासनातील अधीक्षक, मुख्याध्यापक याकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप होत आहे.या शाळेतील एकूण सात विद्यार्थिंनीना दूषित पाणी(Contaminated water) प्यायल्यामुळे उलटी, मळ मळीचा त्रास झाला.सध्या या विद्यार्थिंनीची प्रकृती स्थिर आहे.शाळेत अद्याप कुठलेही आरोग्य पथक पोहचले नाही.